नांदेडला बुधवारी दोन मृत्यू तर ४३ पॉझिटिव्ह, केवळ २६४ रुग्णांवर उपचार सुरु 

शिवचरण वावळे
Wednesday, 18 November 2020

नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात - २८, मुदखेड - एक, किनवट - दोन, बिलोली - दोन, अर्धापूर - एक, हदगाव - दोन, मुखेड - सहा आणि यवतमाळ - एक असे ४३ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.

नांदेड - मागील आठवडाभरापासून सतत कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होतांना दिसतानाच दिवाळी संपताच पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने डोकेवर काढले आहे. बुधवारी (ता. १८) प्रसिद्ध झालेल्या अहवालावरुन दिसून येत आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, २० कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त तर नव्याने ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात - २८, मुदखेड - एक, किनवट - दोन, बिलोली - दोन, अर्धापूर - एक, हदगाव - दोन, मुखेड - सहा आणि यवतमाळ - एक असे ४३ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधिक रुग्णांचीसंख्या १९ हजार ७३७ इतकी झाली आहे. सध्या केवळ २६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९५ टक्के एवढे आहे. बुधवारी २० बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले.

हेही वाचा - कॉग्रेस पक्ष उमेदवार पाडण्यासाठी तर भाजप जिंकण्यासाठी इव्हीएमचा वापर करतय  प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

 २० अतिगंभीर रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १९ हजार ७३७ एवढी झाली आहे. यामध्ये एकूण बरे झालेले रुग्ण १८ हजार ७३९ इतके आहेत. बुधवारी दिवसभरात मृतांमध्ये किनवट येथील ६५ वर्षीय महिला, डोणगाव (ता.बिलोली) येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.  आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ५४३ झाली आहे. सध्या २० अतिगंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज रोजी एक हजार २६९ अहवालापैकी एक हजार २१५ अहवाल प्राप्त झाले.

हेही वाचले पाहिजे - नांदेड : वरसे धनेर कोट दवाळी, बापू तोन मेरा- बंजारा समाजात पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी​

जिल्ह्यातील  शासकीय रुग्णालयात खाटांचा तपशील

त्यातील ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आरटीपीसाआरद्वारे १४ तर ॲन्टिजन टेस्टद्वारे २९ अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १६६ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे ८० खाटा उपलब्ध आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण घेतलेले स्वॅब - १३०२५२ 
एकूण निगेटिव्ह स्वॅब- १०६९२० 
एकूण बाधित - १९ हजार ७३७ 
आजचे बाधित - ४३ 
आजचे मृत्यु - दोन 
एकूण बरे - १८ हजार ७३९ 
उपचार सुरु असलेले - २६४ 
एकूण मृत्यु - ५४३ 
अतिगंभीर रुग्ण - २० 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९४.९५ 
आजचे अनिर्णित स्वॅब- दोन 
आजचे नाकारलेले स्वॅब - सात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two deaths in Nanded on Wednesday While 43 positive Only 264 patients started treatment Nanded News