Nanded : नांदेडमध्ये दोनशे जणांना विषबाधा, लग्नातील जेवण पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Poisoning
Nanded : नांदेडमध्ये दोनशे जणांना विषबाधा, लग्नातील जेवण पडले महागात

Nanded : नांदेडमध्ये दोनशे जणांना विषबाधा, लग्नातील जेवण पडले महागात

कंधार (जि.नांदेड) : दिग्रस खुर्द (ता.कंधार) (Kandhar) येथे रविवारी (ता.२१) एका लग्नातील जेवणाने जवळपास दोनशे जणांना विषबाधा (Food Poisoning) झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२२) दुपारी गावातील लहान-मोठ्यांना मळमळ, उलटी, चकरा, हातपाय दुखणे, जुलाब येणे असे प्रकार सुरू झाल्यानंतर ही बाब उघड झाली. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. भोजुच्यावाडीचे सरपंच प्रतिनिधी सतीश देवकत्ते यांनी तात्काळ याची माहिती उपकेंद्राला दिली. रुग्णांनी उपकेंद्र गाठले. यानंतर रुणावर उपचार सुरू झाले. काही रुग्णांना कंधार येथे रेफर करण्यात आले असून कोणताही रुग्ण गंभीर नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे यांनी दिली. रविवारी दिग्रस बुद्रुक येथील कल्याणकर कुटुंबात लग्न कार्य होते. लग्न लागल्यानंतर लगेच जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. दुपारी चार वाजेपर्यंत जेवण सुरू होते. रात्री (Nanded) काही झाले नाही. दुसऱ्या दिवशी दुपारपासून लग्नात जेवण केलेल्यांना अस्वस्थ वाटू लागले.

हेही वाचा: शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

यामुळे विषबाधेचा प्रकार उघडकीस आला. लगेच रुग्णांना गावातील उपकेंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले. ७० ते ७५ रुग्णांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक रुग्णावर लक्ष ठेऊन आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे यांनी मंगळवारी (ता.२३) सकाळी दिग्रस खु. येथील उपकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आणि काही रुग्णांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर, तहसीलदार संतोष कामठेकर यांनी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर असून बऱ्याच जनावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे यांनी सांगितले.

loading image
go to top