esakal | सराफा दुकानातून सव्वादोन लाखाचे दागिने लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कमल ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.

सराफा दुकानातून सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील सराफा बाजारात असलेल्या एका सराफा दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले तब्बल दोन लाख १८ हजार २०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केली. ही घटना कमल ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.

शहराच्या जुना कौठा येथील विकासनगरमध्ये राहणारे संतोष व्यंकटराव बाराळे (ता. ३४) यांचे सराफा बाजारमध्ये  कमल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी (ता. १८) ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा पुतण्या दुकानात बसला होता. त्या दुकानावर ग्राहक म्हणून दोन तरुण आले. सोन्याचे दागिणे हे दाखवा, ते दाखवा म्हणत दुकानदाराची नजर चुकवून काउन्टरमध्ये ठेवलेले दोन लाख १८ हजार २०० रुपयाचे दागिण्याची पेटी लंपास केली. 

हेही वाचा सासूला सोडवायला गेलेल्या सुनेचा सासऱ्याने केला खुन

दोन लाख १८ हजार २०० रुपयांचे दागिने लंपास 

अनोळखी चोरट्यांनी दोन लाख १८ हजार २०० रुपयांचे दागिने लंपास केले. सकाळी १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. दुकानदाराची नजर चुकवून दागिने लंपास केले. या घटनेप्रकरणी संतोष बाराळे यांनी इतवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय काळे करत आहेत. 

पाच लाखाची खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा 

मुखेड : मोबाईल टॉवरचे काम व्यवस्थित चालू द्यायचे असेल तर पाच लाखांची खंडणी द्या अन्यथा जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुखेड येथील शासकीय रुग्णालय परिसरात साजिदखान इरफानखान यांना आरोपीतानी तुमच्या मोबाईल टावरची कामे व्यवस्थित चालू द्यायचे असतील तर पाच लाखांची खंडणी द्या अशी मागणी केली. ही खंडणी नाही दिली तर जिवे मारण्यात येईल अशी धमकी दिली. या प्रकरणी मोहम्मद साजिद खान यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. काळे करत आहे.

loading image
go to top