नांदेड जिल्ह्यात दोन खूनांच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

यातील एकाची गळा आवळून तर दुसऱ्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारून. या प्रकरणी उमरी व भोकर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा निर्घृण खून करण्यात आला. यातील एकाची गळा आवळून तर दुसऱ्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारून. या प्रकरणी उमरी व भोकर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन घटनांनी पुन्हा एकदा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

भोकर तालुक्यातील बल्लाळ येथील शेतमजूर मारोती गंगाधर गाडेकर (वय ३४) मजूरीसाठी मोहन श्रीखंडे यांच्या शेतात रविवारी (ता. पाच) गेला होता. परंतु तो सायंकाळी घरी परतला नाही. त्याचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अखेर बल्लाळ शिवारात मोहन श्रींखंडे यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या गायरानातील झुडूपामध्ये मारोती गाडेकर याचा मृतदेह सोमवारी (ता. सहा) दुपारी तीन ते चारच्या सुमारास आढळला. त्याला अज्ञात मारेकऱ्यांनी रुमालाच्या किनारपट्टीने गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह झूडपात टाकला. 

हेही वाचाकौतुकास्पद : सफाई कामगाराच्या मुलांनी नाव कमावलं, तिघेही झाले एमबीबीएस

उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा 

नातेवाईकांनी उमरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर उमरी पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी भोकर रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मोहन श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक श्री. अनंत्रे करत आहेत. 

शेतमजूराचा गळा आवळून खून 

तर दुसऱ्या घटनेत भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भोसी शिवारात चार दिवसांपासून बेपत्ता असलेला विनय प्रभाकर कल्याणकर (वय २९) याचा मंगळवारी (ता. सात) मृतदेह आढळला. विनय कल्याणकर याच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारून त्याचा खून करून मृतदेह भोसी येथील अशोक कल्याणकर यांच्या उसाच्या शेतात टाकला. शेतातील सालगडी हा उसाला पाणी देत असतांना हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने लगेच आपल्या मालकाला सांगुन उसाच्या शेतात एकाचा खून झालेला व्यक्ती पडला आहे. त्यानंतर गाव शेजारी असलेल्या या शेतात मयताच्या नातेवाईकानी व गावकऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली. 

येथे क्लिक करापालकमंत्र्यासह प्रशासनावर राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा खासदारांचा आरोप

चार दिवसांपासून होता बेपत्ता

यावेळी चार दिवसांपासून (ता. तीन जूलैपासून) बेपत्ता असलेला विनय कल्याणकरच असल्याचे आढळून आले. लगेच नातेवाईकांनी भोकर पोलिसांना माहिती दिली. भोकरचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मंगळवारी (ता. सात) रात्री उशिरा अभिजीत कल्याणकर याच्या फिर्यादीवरुन अज्ञातविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. डेडवाल करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two murders in Nanded district nanded crime news