esakal | अर्धापूरकरांनो सावधान; पांगरीत आढळले नव्याने कोरोनाचे दोन रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Two new corona patients have been found in Ardhapur taluka

तालुक्यात कोरोना आटोक्यात येत असताना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रूग्णांच्या संख्येने आरोग्य यंत्रणा व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

अर्धापूरकरांनो सावधान; पांगरीत आढळले नव्याने कोरोनाचे दोन रूग्ण

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (परभणी) : तालुक्यात कोरोना हळूहळू पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या आठवड्यात कामठ्यात एक रूग्ण आढळून आल्यानंतर पांगरीत बुधवारी (ता. 24) दोन रूग्ण सापडले आहेत. या दोन रूग्णांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तालुक्यात रूग्णाच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांनी सावधगिरी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमंलबजावणी करावी, असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तालुक्यात कोरोना आटोक्यात येत असताना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रूग्णांच्या संख्येने आरोग्य यंत्रणा व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

नांदेडमधील बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

तालुक्यातील कामठा येथे गेल्या आठवड्यात एक रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर पांगरीत एकास ताप आल्याने उपचारासाठी अर्धापूर येथील रूग्णालयात आणले. त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा पॉझिटिव्ह लक्षने आढळून आले. त्यानंतर त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची तपासणी केली असता वडील पॉझिटिव्ह आढळून आले. या दोन रूग्णांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पांगरीत दोन रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करणे सुरू केले आहे. या गावात सर्वेक्षण करून तपासण्या करण्यात येत आहेत. तसेच प्रतिबंधक क्षेत्र घोषित करणे, ज्या भागात रूग्ण आढळून आले, त्या भागात फवारणी करणे आदी उपाय योजना करण्यात येतील. तसेच नागरिकांना घाबरून न जात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिका-यांनी केले आहे.

loading image
go to top