
Omicron In Nanded : नांदेडमध्ये आफ्रिकेतून आलेल्या दोघांना ओमिक्राॅनची बाधा
नांदेड : नांदेडमधील दोघांना कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनची (Omicron) लागण झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी (ता.२७) माहिती दिली. दक्षिण आफिक्रेतून आलेल्या तीन जणांचा कोरोना (Corona) टेस्ट पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिघांना हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथे पाठविले होते. यातील दोघांचा अहवाल ओमिक्राॅन(Omicron) पाॅझिटिव्ह आला आहे. विदेशातून जिल्ह्यात (Nanded) आलेल्या ३०० पेक्षा अधिक नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील हिमायतनगर (Himayatnagar) तालुक्यातील तीन जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते.(Two People Tested Omicron Positive In Nanded)
हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत ५३ जणांनी ख्रिश्चन धर्म सोडला अन् बनले हिंदू
नंतर तिघानांही हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवले होते. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंची कोरोना तपासणी करण्यात आली व त्यांना विलगीकरणात ठेवले गेले. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
हेही वाचा: सेलू पालिका निवडणूक : सत्ताधारी, विरोधकांत धार्मिक कार्यक्रमासाठी चढाओढ
आज दोघांच्या अहवालात ओमिक्राॅनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
Web Title: Two People Tested Omicron Positive In Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..