दोन पिस्टल जप्त, एकाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

फोटो
फोटो

नांदेड : शहरातील फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांच्या शोधात असलेल्या पथकाच्या हाती अट्टल गुन्हेगार लागला. गावठी पिस्टलसह त्याला अटक केली असून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नईआबादी परिसरात गुरूवारी (ता. चार) दुपारी केली. 

कोरोना या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फायदा काही सराईत गुन्हेगार घेत आहेत. कारण पोलिस यंत्रणा या कामात व्यस्त असल्याचे पाहून पोलिसांना पाहिजे असलेले गुन्हेगार शहरात उजळमाथ्याने फिरत आहेत. अशा गुन्हेगारांना अटक करा अशा सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरुन श्री. चिखलीकर यांनी आपल्या सर्वच सहकाऱ्यांना कामाला लावले. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती हे आपले सहकारी सहाय्यक फौजदार जसवंतसिंग शाहु, अब्दुल रब, हवालदार मारोती तेलंग, दशरथ जांभळीकर, संजय केंद्रे, बजरंग बोडके, मोतीराम पवार, गजानन बैनवाड आणि तानाजी यळगे यांना सोबत घेऊन गुरूवारी (ता. चार) शहरात गस्त घालण्यात सुरूवात केली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन आरोपीचा शोध सुरू केला. तो आपल्या नईआबादी येथील घरी असल्याचे समजताच त्या ठिकाणी कारवाई करुन आरोपी अब्दुल वाजीद अब्दुल मन्नान (वय ३५) याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता एक गावठी पिस्टल सापडले. पिस्टल जप्त करून अब्दुल माजीद याच्याविरुद्ध पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

रामतिर्थ पोलिसांनी केले पिस्तुल जप्त 

नरसी ते बिलोली रस्त्यावर ता. एक जूनच्या रात्री पिस्तुलातून गोळीबार करुन जखमी व्यापाऱ्यांकडून सव्वा सात लाख लुटणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून चोरलेली सर्व रक्क्म जप्त करून पोलिस कोठडी देण्यात आली होती. या कोठडी दरम्यान त्यांच्या सांगण्यावरून लोहगाव (ता. बिलोली) शिवारात फेकून दिलेले पिस्तुल जप्त केले. त्यांची गुरूवारी पोलिस कोठडी संपत असल्याने सायंकाळी त्यांना परत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींची रवानगी कारागृहात केल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com