मुंबई आणि पुणेकरिता दोन विशेष गाड्या, दमरेचा निर्णय 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 21 January 2021

या दोन्ही  रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे आणखी दोन विशेष गाड्या चालवत आहे. या दोन्ही  रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. 
    
गाडी क्रमांक ०७६१८ हुजूर साहेब नांदेड ते मुंबई छत्रपती टर्मीनन्स ता. २६ जानेवारी ते पुढील सुचणेपर्यंत धावणार.
गाडी क्रमांक ०७६१७ मुंबई छत्रपती टर्मीनन्स ते हुजुर साहेब नांदेड ता. २७ जानेवारी ते पुढील सुचणेपर्यंत धावणार आहे. 
गाडी संख्या ०७६१८ तपोवन एक्सप्रेस नांदेड येथून सकाळी १०. ०५ वाजता सुटून परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सी. एस. एम. टी. येथे रात्री २१. ५५ वाजता पोहोचेल. 

गाडी संख्या ०७६१७ तपोवन एक्सप्रेस मुंबई सी. एस. एम. टी. येथून सकाळी सव्वासहा वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे सायंकाळी सहा  वाजता नांदेड येथे पोहोचेल. या गाडीस १८ डब्बे असतील.  
 
गाडी क्रमांक ०२७३० हु. सा. नांदेड ते पुणे द्वी- साप्ताहिक हु. सा. नांदेड येथून दर मंगळवारी आणि रविवारी ता. २६ जानेवारी ते पुढील  सुचणेपर्यंत
०२७२९ पुणे ते हु. सा. नांदेड द्वी- साप्ताहिक पुणे येथून दर बुधवारी आणि सोमवारी ता. २७ ते पुढील सुचणेपर्यंत गाडी संख्या ०२७३० पुणे एस्क्प्रेस नांदेड येथून रात्री २१. ३० वाजता सुटून परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे पुणे येथे सकाळी ९. ४० वाजता पोहोचेल. गाडी संख्या ०२७२९  पुणे एस्क्प्रेस पुणे येथून रात्री २२ वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे सकाळी १० वाजता पोहोचेल. या गाडीस १७ डब्बे असतील. 

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड- १९ संसर्गासंदर्भात वेळो- वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two special trains for Mumbai and Pune, Damre decision nanded news