नांदेड : विष्णुपुरीच्या रुग्णालयात दोन हजार बालकांना नवजीवन

तीन महिन्यांपासून सेवेत; नवीन बाल, नवजात शिशू अतिदक्षता विभाग
co vaccine
co vaccinesakal
Updated on

नांदेड : कोविडच्या आव्हानानंतर शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात आहे. त्यादृष्टीने तीन महिन्यापूर्वी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील बाल विभागाला अधिक सक्षम केल्याने अवघ्या तीन महिन्यांत बाल रुग्णांच्या सेवेत रुजू झालेल्या एका अद्ययावत वार्डाने दोन हजार बालकांना नवजीवन मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.

कोविडच्या दृष्टीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या नवीन बाल व नवजात शिशू अतिदक्षता विभागाद्वारे चांगल्या सुविधा निर्माण झाल्याचा सर्वांना लाभ होत आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या या विभागात एकाच वेळी दीडशे बालकांना दाखल करुन घेण्याची क्षमता आहे. ऑक्टोंबर महिन्यात लहान मुलांच्या निमोनिया, डेंग्यू, मेंदूज्वर, टायफाईड व इतर आजारांचे प्रमाण एकदम वाढले होते.

जिल्ह्यातील १६ तालुक्यासह शेजारील तेलंगणा व परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील गंभीर आजाराची मुले उपचारासाठी मुले येथे दाखल होती. ऑक्टोंबरमध्ये या वार्डात नऊशे बालकांवर उपचार करण्याचे आव्हान येथे कार्यरत बारा तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांनी स्विकारुन ते पूर्ण करुन दाखविले. डिसेंबरच्या पहिल्या तारखेपर्यंत या वार्डातून दोन हजार मुले बरे होऊ सुखरूप घरी पोहचले असल्याची माहिती बालरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. सलीम तांबे यांनी माहिती दिली.

अत्याधुनिक बाल विभागाच्या बाबतीत राज्यात डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या व बालरुग्ण विभागाचा पहिला क्रमांक येतो. या खालोखाल पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचा क्रमांक लागतो असे सांगितले जाते. या ठिकाणी मल्टी पॅरामॉनिटर्सपासून सेंट्रल, मॉनिटर्स सिस्टीम, कार्डीयाक मॉनिटर, क्युबिकल विथ व्हेंटिलेटर, वॉर्मर्स अश्या अत्याधुनिक उपकरणांनी बालकांचा वार्ड सज्ज आहे. आज याचा उपयोग नांदेड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील मुलांनाही होत आहे. येथील वैद्यकीय पथक ज्या मिशन मोडवर काम करते आहे. त्याचे विशेष कौतुक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

co vaccine
नागपूर : विदेशातून आलेल्या शंभर जणांवर ‘वॉच’

"मागील तीन महिन्यात १२ डॉक्टर व पथकाने दिवसाची रात्र करुन एकही सुटी न घेता अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या दोन हजार बालक व खास कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन बेडच्या वार्डमध्ये जवळपास एक हजार तिनशे बाल रुग्णांना उपचार करुन रुग्णालयातून घरी पाठविले आहे."

- डॉ. सलीम तांबे, बालरुग्ण विभाग प्रमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com