नांदेडमध्ये दुचाकी चोराला पोलिस कोठडी, नऊ वाहने जप्त

file photo
file photo

नांदेड : लॉकडाउनच्या काळात शहर व जिल्‍ह्यात वाहने चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. पार्कींगमध्ये लावलेल्या दुचाकी व चार चाकी वाहने हातोहात लंपास करत आहेत. अनेक तक्रारी वरिष्ठ पोलिसांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सक्त सुचना दिल्या. यानंतर भाग्यनगर पोलिसांनी दुचाकी टोळीतील एकाला अटक केली. त्याच्याकडून आठ दुचाकी व ॲपे ॲटो अशी नऊ वाहने जप्त केली. त्याला न्यायालयाने तिन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. मागील तिन महिण्यापासून जवळपास ३५ दुचाकी वाहने चोरीला गेले. 

नांदेड शहराच्या गर्दीच्या ठिकाणी व अडगळीच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकी लंपास होण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत आहेत. अडगळीला लावलेल्या दुचाकी तर चोरीला जातातच त्याउलट मुख्य रस्त्यावरील दुचाकी लंपास होत आहेत. सध्या लॉकडाउनमध्ये तात्पुरत्या आठवडी बाजारातून दुचाकी चोरी होत आहेत. दुचाकी वाहनधारक आपली तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेल्यानंतर ठाण्यात त्यांचीच प्रतिप्रश्‍न विचारून बोळवण करतात. अगोदर शोधा त्यानंतर तक्रार द्या असा सल्ला पोलिस देत असतात. त्यामुळे अनेकजण आपली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. 

शहर व जिल्ह्यातून जवळपास ३५ वाहने लंपास केल्याच्या नोंदी

लॉकडाउनच्या काळात पोलिस यंत्रणा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बंदोबस्तात व्यस्त होते. याचा फायदा वाहन चोरट्यांनी घेतला. शहर व जिल्ह्यातून जवळपास ३५ वाहने लंपास केल्याच्या नोंदी विविध पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने लॉकडाउनपूर्वी शंभरहून अधिक दुचाकी वाहने ज्त करून पंधरा चोरांना अटक केली होती. त्यानंतर बऱ्याचअंशी दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसला होता. मात्र पुन्हा या चोरट्यांनी आपले डोके वर काढले आहे.
 
नऊ चोरीचे वाहने जप्त

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या सुचनेनुसार भाग्यनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक अभिमन्यु सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजाभाऊ जाधव यांनी सापळा लावून दुचाकी चोराचा माग काढत त्याला ताब्यात घेतले. सतिश रामराव वाठोरे रा. सिरंजनी (ता. हिमायतनगर) व सध्या प्रभातनगर, नांदेड असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून तळणी (ता. नांदेड) शिवारात एका नाल्यात ठेवलेल्या शहराच्या विविध भागातून चोरलेल्या आठ दुचाकी व एक ॲपे ॲटो जप्त केले. त्याला अधिक विचारना केली असता त्याने शैलेश उर्प खन्या नवनाथ सांवत रा. तळणी (ता. नांदेड) हा सहकारी असल्याचे त्याने सांगितले. मात्र तो पोलिसांना सापडला नाही. सतिश वाठोरे याला भाग्यनगर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तिन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com