धक्कादायक ! ‘ते’ दोघे अखंड प्रेमात अन्...

2.jpg
2.jpg


बिलोली, (जि. नांदेड) ः बिलोली तालुक्यातील केरूर येथील तरुणी आणि किनाळा येथील तरुण एक दुसऱ्याच्या प्रेमात अखंड बुडालेले असताना मुलीच्या घरच्यांनी २४ दिवसांपूर्वीच तरुणीचे लग्न लावून दिले होते. मात्र, या दोन्ही प्रेमी युगुलांनी सोमवारी (ता. २२) रात्री घरातून पलायन करून अटकळी व वझरगाव दरम्यान असलेल्या मन्याड नदीमध्ये जीव दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी उघडकीस आली. विषेश म्हणजे दोघांनीही कमरेला ओढणी बांधून आत्महत्या केली आहे.

मयत प्रेमी युगुल हे बिलोली तालुक्यातील असून किनळा येथील २१ वर्षांचा तरुण प्रवीण त्र्यंबक कौटककर हा नरसी येथील एका खासगी दुकानात नोकरी करत होता. पण त्याचे केरूर येथील एका तरुणीवर मन जडले. तरुणीही प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न करण्याचा विचार केला होता. मात्र, सदर तरुणीच्या घरच्या मंडळींनी (ता.२९) मे रोजी मुलीचे लग्न लावून दिले. यामुळे प्रवीण बेचैन झाला होता, तर ती तरुणीही प्रेमाचा विरह सहण करून संसाराला लागली होती. परंतु, सदर तरुणी केरूर येथे माहेरी आली असता (ता. २२)च्या रात्री घरातून गायब झाली.

मुलगी रात्री घरातून गायब झाल्याने घरातील मंडळींना संशय आला होता व मंगळवारी (ता. २३) रामतीर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार होते. तेवढ्यात अटकळी-वझरगाव दरम्यान असलेल्या मन्याड नदीच्या पात्रात दोघांचे प्रेत आढळून आल्याची दुपारी २:३० च्या दरम्यान माहिती मिळाली. त्यामुळे रामतीर्थ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता नदीच्या किनाऱ्यावर दोघांच्या चपला व तरुणीची ओढणी दिसून आली. त्यामुळे या प्रेमी युगुलाने पुलावरून उडी मारण्याऐवजी दोघांनी एकदुसऱ्याच्या कमरेला ओढणी बाधून घेऊन खोल पाण्यात जावून जीव दिला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


सदरची घटना प्रेमी युगुलांच्या घरी कळताच किनाळा व केरूर येथे प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या वेळी पोलिसांनी एकमेकांच्या मिठीतच असलेल्या मयत प्रेमी युगुलास बाहेर काढले व दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही तालुक्यांत खळबळ उडाली आहे. या घटनेची मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मूत्यूची नोंद घेण्यात आली


आधार कार्ड व दागिन्यावरून ओळख पटली
नदीपात्रात उडी मारण्यापूर्वी दोघांनीही आपले आधार कार्ड पुलावर थांबलेल्या मोटरसायकलच्या डिकीमध्ये ठेवून नदीपात्रात उडी घेतली. मयत तरुणीचे सर्व दागिने मोटारसायकलच्या डिकीत सापडले. दोघांचे आधार कार्डही त्याच ठिकाणी आढळून आल्यामुळे ओळख पटणे सोयीचे झाले.


आकस्मिक मृत्यूची नोंद
या घटनेची मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मूत्यूची नोंद घेण्यात आली असून ही घटना समजताच बिलोली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्र्वर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास सहपोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक राम घाडगे यांनी या घटनेचा मागोवा घेऊन शवविच्छेदनासाठी सहकार्य केले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com