दुचाकीस्वार चोरांचा हैदोस, महिलेची पर्स लंपास 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 12 July 2020

अनोळखी दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावून लंपास केली. या पर्समध्ये नगदी व सोन्या- चांदीचे दागिने असा ५७ हजाराचा ऐवज होता.

नांदेड : पतीसोबत दुचाकीवरून सासरी जाणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स अनोळखी दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावून लंपास केली. या पर्समध्ये नगदी व सोन्या- चांदीचे दागिने असा ५७ हजाराचा ऐवज होता. घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारी कापूस संशोधन केंद्र धनेगाव ते गोलाई वाजेगाव रस्त्यावर घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुदखेड येथील मठगल्लीमध्ये राहणाऱ्या भाग्यश्री नामदेव कहाळेकर (वय २६) ह्या आपल्या पतीसोबत कापसी गुंफा (ता. लोहा) येथून आल्या त्याच मार्गे आपल्या दुचाकीवरून सासरी मुदखेड येथे जात होत्या. त्यांची दुचाकी धनेगाव गोलाई चौकात येताच त्यांच्या पाठीमागून विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी भाग्यश्री कहाळेकर यांच्या हातातील ५७ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स जबरीने हिसकावून घेऊन पळ काढला. भाग्यश्री कहाळेकर यांना धक्का लागल्याने त्यांना नेमके काय झाले हे समजलेच नाही. त्यांच्या पतीने लगेच आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबविली. मात्र तोपर्यंत चोरटे हे बरेच अंतर पसार झाले होते. 

हेही वाचा तुम्हाला माहिती आहे का? नारळ, सुपाऱ्या विकून झाले डॉ. भालचंद्र मुणगेकरांचे शिक्षण...

दुचाकीस्वारांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा

आपली लहान मुलगी व पत्नीला घेऊन नामदेव कहाळेकर हे घडलेला प्रकार सांगण्यासाठी व तक्रार देण्यासासठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले. परंतु पोलिसांनी या प्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची दखल घेतली नाही. आम्हाला का तेच काम आहे का असे उलट प्रश्न विचारून त्यांची बोळवण केली. रात्री उशिरा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाग्यश्री नामदेव काळेकर यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी दुचाकीस्वारांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रशांंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोविंद खैरे करत आहेत. 

नाथनगर हनुमान गड परिसरात ४० हजाराची घरफोडी

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाथनगर हनुमान गड परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक दिगंबर एकनाथ मुसळे हे आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेले होते. ता. नऊ जुलैच्या दुपारी १२ ते ता. १० जुलैच्या सहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने असा ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. दिगंबर मुसळे यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार श्री कुरुळेकर करत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler thief's , woman's purse lampas nanded news