esakal | अनाधिकृत आरआरबीटी कपाशीची लागवड करु नये- कृषी विभागाचे शेतकर्‍यांना आवाहन

बोलून बातमी शोधा

b.t. cotton
अनाधिकृत आरआरबीटी कपाशीची लागवड करु नये- कृषी विभागाचे शेतकर्‍यांना आवाहन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : परराज्यातून बाजारात अनधिकृतपणे आर.आर. बी. टी. किंवा चोर बीटी या नावाने प्रचलित असलेल्या कपाशीला लागवडीसाठी बंदी आहे. ही बीटी कपाशी बोंडआळी प्रतिकारक्षम नसल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी या अनाधिकृत बीटीची लागवड करु नये असो आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी मे महिन्यात बीटी कपाशीची लागवड करतात. यामुळे सध्या बाजारात परराज्यातून अनधिकृत मार्गाने आर.आर. बी. टी. बियाणे विक्रीसाठी येण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आर. आर. बी. टी. हे वान लागवड करू नये, याबीटी वाणाच्या वापरामुळे ग्लायफोसेट या तणनाशकाचा अनावश्यक वापर वाढेल. तसेच या तणनाशकाचा अतिवापरामुळे जैवविविधतेस बाधा येऊन जमीन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही बीटी कपाशी गुलाबी बोंड आळीला प्रतिकारक्षम नसल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच या बियाणास उत्पादनासाठी अधिकृत मान्यता नसल्याने सदरील बियाणे पूर्णपणे अनधिकृत रित्या उत्पादित केले आहे.

हेही वाचा -वसमतमध्ये १०० बेडचे विनामुल्य कोविड सेंटर चालवणार; कन्हैया बाहेतीनी मागितली परवानगी

त्याच्या सत्यत्तेची तपासणी कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत झाली नाही. असे अनाधिकृत बियाणे बाळगल्यास संबंधितावर कापूस बियाणे अधिनियम २००९, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार पाच वर्षापर्यंत कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. यामुळे शेतकर्‍यांनी अनधिकृतपणे छुप्या मार्गाने मिळणार्‍या आर. आर. बी. टी. ची खरेदी करून त्याची शेतात लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, आत्माचे प्रकल्प संचालक माधव सोनटक्के यांनी शेतकर्‍यांना केले आहे.