सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकास जन्मठेप

सुनिल पौळकर
Wednesday, 17 June 2020

अत्याचारी काकास मुखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन त्रिभूवन यांनी मंगळवारी (ता. १६) वीस वर्ष सक्त मजुरी आणि रोख पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली

मुखेड (जिल्हा नांदेड)  : दुरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी शेजारीच असलेल्या आपल्या चुलत काकाच्या घरात गेलेल्या एका सहा वर्षीय पुतणीवर नराधम २५ वर्षीय काकाने अत्याचार केला. या अत्याचारी काकास मुखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन त्रिभूवन यांनी मंगळवारी (ता. १६) वीस वर्ष सक्त मजुरी आणि रोख पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

मुखेड शहरातील गायत्रीनगर भागात राहणारी सहा वर्षीय बालिका आपल्या शेजारी असलेल्या काकाच्या घरात टीव्ही पाहण्यासाठी नेहमी जात होती. या गरीब बालिकेच्या घरी टीव्ही नव्हता म्हणून ती दररोज शेजाऱ्यांकडे टीव्ही पाहण्यासाठी जात असे. ते घर संतोष उर्फ बंटी राम घोगरे (वय २५) यांचे होते. ता. चार एप्रिल २०१८ मध्ये काका बंटीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याने त्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब घरी कुणाला सांगितलीस तर तुला व तुझ्या घरच्याना ठार मारीन अशी धमकी दिली. रडत- रडत बालिका आपल्या घरी परतल्यानंतर तिच्या पालकांनी तिला रडायला काय झाले म्हणून विचारणा केली. यावेळीकाकाने केलेला कारनामा ऐकून तिच्या पालकानाही धक्का बसला. 

हेही वाचा -  ब्रेकींग : कोरोनाची पोलिस विभागात एन्ट्री, जिल्ह्यात एक पोलीस कोरोना बाधित

नराधम काकाचा घृणास्पद कारनामा

संतप्त पालकांनी तिला सोबत घेऊन मुखेड पोलिस ठाणे गाठले. पोलिसात तक्राj दिल्यानंतर पीडीत बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर संतोष उर्फ बंटी घोगरे याच्याविरूद्ध अत्याचार, बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. मुखेड पोलिसांनी नराधम संतोष घोगरेला अटक केली. अटक झाला तेंव्हापासून तो कारागृहातच होता. त्यानंतर संतोष घोगरे विरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करून पोलिस उपनिरीक्षक कविता जाधव यांनी मुखेड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

मुखेड न्यायालयाची निर्णय

न्यायालयात या प्रकरणी बाजू मांडताना ॲड. महेश कागणे यांनी असंख्य मुद्यांचा उल्लेख न्यायालय समक्ष केला. पुराव्यांच्या आधारावर व पीडीत बालिकेचे बयान व वैद्यकीय अहवालावरून न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांनी संतोष घोगरे याला दोषी मानले आणि त्यास वीस वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा निकाल ऐकण्यासाठी मुखेड न्यायालयात पिडीत बालिकेचे व नराधम आरोपीचे नातेवाईक उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle rape six-year-old nephew in prisons nanded news