esakal | ब्रेकींग : कोरोनाची पोलिस विभागात एन्ट्री, जिल्ह्यात एक पोलीस कोरोना बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मंगळवारी (ता. १६) रात्री उशिरा थेट पोलीस विभागातच एन्ट्री केली. आता जिल्ह्यात पहिला पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला आहे.

ब्रेकींग : कोरोनाची पोलिस विभागात एन्ट्री, जिल्ह्यात एक पोलीस कोरोना बाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील डॉक्टर, बँक कर्मचारी, रेशन दुकानदार, तहसील कार्यालय आदी विभागत पोहचलेल्या कोरोनाने मंगळवारी (ता. १६) रात्री उशिरा थेट पोलीस विभागातच एन्ट्री केली. आता जिल्ह्यात पहिला पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला आहे. त्याला त्याच्या कोरोना बाधीत आजीकडून बाधा झाल्याचे पुढे आले आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या कोरोना अवहालातून ही बाब पुढे आली आहे. बरकतपुरा भागातील एका महिलेला कोरोनाची लागन झाली आणि यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला होता. याच महिलेचा नातु नंतर कोरोना बाधित असल्याचे निष्पण झाले. तर काल मंगळवारी प्राप्त अवहालात त्या महिलेचा दुसरा मुलगा अर्थात पोलीस कर्मचारी हा देखील कोरोना बाधित असल्याचे निष्पण झाले आहे. यामुळे हा कर्मचारी राहत असलेला बरकतपुरा हा परिसर सिल करण्यात आलाच आहे मात्र आता शहरातील एक पोलिस ठाणेच कन्टेनमेंट झोन करण्याची वेळ प्रशासनावर आल्याचे बोलल्या जात आहे.

हेही वाचाकोरोना अपडेट - नांदेडला दिवसभरात २४ व्यक्ती कोरोनाबाधित

प्रशासनाचीही चांगलीच धांदल उडत आहे

वाढत्या रुग्ण संख्येमुळे नांदेड जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही चांगलीच धांदल उडत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये बाधीत झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा सर्वाधीक समावेश आहे. 

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण १३ 

रविवारी व सोमवारी, मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालापैकी काही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते. चार अहवालांचा निष्कर्ष अनिर्णीत आहे. सद्यस्थितीत ८४ बाधित व्यक्तींवर औषधोपचार चालू असून त्यातील तिन बाधितांमध्ये ५२ वर्षाची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण १३ आहे.

पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत

नांदेड जिल्ह्यात ९० बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४७, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे सहा बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

येथे क्लिक करानांदेडच्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा 

आकडे बोलतात

सर्वेक्षण- एक लाख ४८ हजार ५१,
घेतलेले स्वॅब पाच हजार १९,
निगेटिव्ह स्वॅब चार हजार ३४७,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-२४
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती २८४
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १९१,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ८३,
मृत्यू संख्या १३,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या १८६
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ९०

जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

loading image