विकेल ते पिकेल धोरणातर्गंत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा

प्रल्हाद कांबळे
Thursday, 21 January 2021

ता. 26 ते 29 जानेवारी या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी सहा यावेळेत आयोजित केला आहे.

नांदेड :- “विकेल ते पिकेल” या धोरणांतर्गंत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा कृषि विभागामार्फत ता. 26 ते 29 जानेवारी या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी सहा यावेळेत आयोजित केला आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे फळे व भाजीपाला, विविध सेंद्रीय उत्पादने, गहु, ज्वारी, तांदुळ इ. धान्य, तुर, मुग, उडीद,  इत्यादी डाळी,  हळद, मिरची पावडर इत्यादी मसाले, लाकडी घाण्याचे तेल, सेंद्रीय गुळ, पाक, मध, विविध प्रकारचे पापड, लोणचे, चटण्या, शेतमालावर प्रक्रिया केलेले विविध पदार्थ इत्यादी शेतकऱ्यामार्फत ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आधार संलग्नीकरण करुन घ्यावे  

नांदेड :- अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अद्यापपर्यंत आपले आधार नंबर एनपीसीआय मॅपरशी लिंक केले नाहीत त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून आपले आधार क्रमांक एनपीसीआयशी लिंक करुन घ्यावे व महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करुन आपआपली प्रोप्राईल अद्यावत करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर  यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षात भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापपर्यंत जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक मोबाईल नंबरवर याबाबतचा मेसेज समाज कल्याण कार्यालयामार्फत पाठविण्यात आला आहे. महाविद्यालयामार्फत सुध्दा विद्यार्थ्यांना तसे कळविण्यात आलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under the sell-to-pick policy, farmers to consumers should meet directly nanded news