esakal | पाचशे परिचारिकांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड , २० पैकी १४ शासकीय कोविड सेंटर बंद, जेवणही दिले जात नसल्याची तक्रार 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सहा - सात महिन्यांपूर्वी देशभरात कोरोनाची पहिली लाट पसरली. नवीन संसर्गजन्य आजार अतिवेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली. देशात रात्रीतून कुठे पाचशे तर कुठे दोन हजार बेडचे कोविड सेंटर सुरू करावी लागली. नांदेड जिल्ह्यात देखील २० कोविड सेंटर सुरू करण्यात आली. 

पाचशे परिचारिकांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड , २० पैकी १४ शासकीय कोविड सेंटर बंद, जेवणही दिले जात नसल्याची तक्रार 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना काळात शहरासह जिल्ह्यात १६ तालुक्यांतील आरोग्य केंद्रांत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. यासाठी काही दिवसांपूर्वीच जवळपास सहाशे परिचारिकांची अल्प मुदतीवर कोविड योद्धा म्हणून भरती करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा जोर ओसरल्याने पाचशे परिचारिकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांना घरी बसवल्याने अनेक परिचारिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 

सहा - सात महिन्यांपूर्वी देशभरात कोरोनाची पहिली लाट पसरली. नवीन संसर्गजन्य आजार अतिवेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली. देशात रात्रीतून कुठे पाचशे तर कुठे दोन हजार बेडचे कोविड सेंटर सुरू करावी लागली. नांदेड जिल्ह्यात देखील २० कोविड सेंटर सुरू करण्यात आली. 

हेही वाचा- नांदेडमध्ये घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास अटक ​

आनंदावर विरजन

त्यासाठी हंगामी स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून मधुमेह तज्ज्ञ, हृद‍यरोग तज्ज्ञ, उच्चरक्तदाब तज्ज्ञ डॉक्टर, लॅब, एक्सरे टेक्निशियन यांच्यासह सहाशे परिचारिकांची २० हजार रुपये मानधनावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे नर्सिंग कोर्स केलेल्या अनेकांना काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यांचा हा आनंद फार जास्त काळ टिकला नाही. 

हेही वाचले पाहिजे- खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले नांदेडला येणाार

जेवणाचे बजेट संपले

सध्या शासनाकडे पुरेसे बजेट नसल्याने परिचारिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी मंगळवारी (ता. तीन) परिचारिकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांच्याकडे जेवणाची तक्रार घेऊन आल्या होत्या. डॉ. भोसीकर यांनी परिचारिकांच्या जेवणाविषयी जिल्हाधिकारी यांच्याकडे बजेटसाठी बोलून आठ दिवसांपर्यंत थांबण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर परिचारिका माघारी परतल्या. 

कोरोनाबाधितांची संख्या कमी
कोरोनाबाधितांची संख्या कमी होत गेल्यास उर्वरित शंभर परिचारिकांना देखील कामावरून कमी करण्यात येणार आहे. मात्र, असे असले तरी, कोरोनाची दुसरी लाट आल्यास पुन्हा याच परिचारिकांना कोरोना योद्धा म्हणून कामावर रुजू करून घेतले जाईल. 
- डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड. 

loading image