वेतनासाठी कामगारांचे अनोखे उपोषण

NND18KJP02 copy.jpg
NND18KJP02 copy.jpg

नांदेड : लॉकडाऊन काळातील वेतन मिळावे, रोजगार पुर्ववत सुरु करावा, वीडी उद्योगाला कायदेशीर संरक्षण मिळावे, केंद्रीय वीडी कामगार श्रम कल्याण संघटनाद्वारे प्रत्येक कामगाराला दरमहा सात हजार रुपये द्यावेत या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीडी कामगार फेडरेशनने पुकारलेल्या घरबसल्या उपोषण आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील हजारो वीडी कामगारांनी सहभाग नोंदविला आहे, असे कामगार नेते कॉ. प्रदीप नागापूरकर यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

हातावर पोट असणाऱ्याचे बेहाल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या श्रमिक, कष्टकऱ्यांचे अत्यंत बेहाल सुरु आहेत. राज्यातील वीडी उद्योगाद्वारे लाखो कामगारांना रोजगार मिळतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्वाभीमानाने अत्यल्प मजुरीत हे वीडी कामगार स्वतःच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमुळे सध्या वीडी उद्योग बंद असल्याने व कामगारांना रोजगाराची इतर साधने उपलब्ध नाहीत. 

विविध मागण्यासाठी अनोखे उपोषण
वर्षानुवर्ष अनेक कामगार या क्षेत्रात काम करीत आहेत. व्यवस्थापनाने अनेक ठिकाणी मार्च मध्ये केलेल्या कामाचेही वेतन दिले नाही. त्यामुळे कामगार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीडी कामगार फेडरेशन व नांदेड येथील लाल बावटा प्रणित इंडस्ट्रीयल वर्कर्स युनियनने विविध मागण्यासाठी अनोखे उपोषण केले.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या
वीडी कामगारांना लॉकडाऊन काळातील पूर्ण पगार द्यावा, तेलंगणा प्रमाणे वीडी कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, केंद्रीय वीडी कामगार कल्याण संघटनच्यावतीने प्रत्येक कामगारास प्रतिमहा सात हजार रुपये द्यावेत, वीडी उद्योगाला कायदेशीर संरक्षण द्यावे, कारखाने पुर्ववत चालू करावेत या व इतर मागण्यांसाठी आज सोमवारी (ता. १८) घरी बसून लाक्षणिक उपोषणाची हाक दिली होती. यात नांदेड जिल्ह्यातील नांदेड, देगलूर, धर्माबाद, कुंडलवाडी आदी भागातील कामगारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत घरी बसून एक दिवसाचे उपोषण केले. 

कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण
आंदोलन यशस्वी करण्यासाठी कामगार नेते कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. के. के. जांबकर, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. श्याम सोनकांबळे, कॉ. गौतम सुर्य, कॉ. गणेश संदुपटला, कॉ. गुरुपुट्टा, कॉ.पद्मा तुम्मा, कॉ. अनिता ठाकूर, कॉ. रमा बिसेन, कॉ. शारदा गुरुपवार, कॉ. गोदावरी पवार, कॉ. कलावती कोंडापाक, कॉ. रेखाबाई खेडगी, कॉ. सुनिता सातपुते, कॉ. द्वारकाबाई चिटकलवार, कॉ. शिवराणी, कॉ. शोभा पवार, कॉ. लताबाई नायर, कॉ. नरेश खेडगी, कॉ. जब्बार खान, कॉ. अख्तर खान आदींनी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com