शेतकऱ्यांनी काळजी करु नये......कशासाठी ते वाचा

fertilizer.jpg
fertilizer.jpg

नांदेड : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध खतांची मागणी मंजूर आंवटनानुसार जिल्ह्याला आतापर्यंत एकेचाळीस हजार मेट्रिक टन झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. खरीपासाठी जिल्ह्यात रासायणीक खताचा मुबलक साठा असल्याचे काळजी करण्याची गरज नसल्याचे यावेळी प्रशासनाने सांगीतले.

दोन लाख २७ हजार ९८० मेट्रिक टन खत मंजूर
जिल्ह्यासाठी आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खताची मागणी कृषी विभागाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली होती. त्यानुसार दोन लाख २७ हजार ९८० मेट्रिक टन खताचे आंवटनतं मंजूर झाले आहे. यामध्ये युरिया सात हजार ८४० टन, डीएपी ३७ हजार ३६० टन, म्युरेट ऑफ पोटॅश २० हजार पाचशे टन, एनपीके ५२ हजार ५६० टन तर एमओपी ३९ हजार ३५० टन असा खताचा समावेश आहे.

४१ हजार टन खताचा पुरवठा 
कृषी विभागाच्या मागणीनुसार एप्रिल महिन्यामध्ये युरिया दहा हजार ३९६ टन प्राप्त झाला आहे. तर डीएपी सात हजार १६ टन, एमओपी ९५० टन, एनपीके ११ हजार ४२६ टन, एसएससी एक हजार ४४४ टन असे एकूण ३१ हजार २३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. हे खत मुख्य वितरकाच्या माध्यमातून किरकोळ विक्रेत्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यासोबतच मे महिन्यामध्ये आजपर्यंत दहा हजार ७५० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. यात युरिया ९५० टन, डीएपी दोन हजार सातशे टन, एकओपी दोन हजार सहाशे टन, एनपीके चार हजार पाचशे टन असे एकूण हदा हजार ७५० टन मेट्रिक टन खत प्राप्त झाले आहे. 

तक्रार असल्यास करा संपर्क
जिल्ह्यात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा संबंधित तक्रारी असल्यास त्यांनी तालुका तक्रार निवारण समितीकडे व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करावा. तसेच जिल्हास्तरावर तक्रारीसाठी राज्य शासनाचे कृषी विभाग तसेच जिल्हा परिषद स्तरावर संपर्क करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे वापरा
शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सोयाबीन, मूग, उडीद व तूर या पिकाचे घरचे बियाणे वापरण्यास प्राधान्य द्यावे. तसेच सोयाबीनची उगवण क्षमता तपासून सोयाबीनची पेरणी करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अधिकृत सेवा केंद्रातून बियाणची व निविष्ठांची खरेदी करावी. बियाणाची अंतिम मुदत बघून तसेच अधिकृत पावती घेऊन खरेदी करावी. खरेदी केलेल्या बॅक जपून ठेवावी. जेणेकरून या संबंधित तक्रार झाल्यास त्याचा उपयोग होईल. तसेच अधिकृत आपल्या गावात असल्यास त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना द्यावी असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com