पोलिस कर्मचाऱ्याऐवजी पोलिस अंमलदार असा शब्दप्रयोग करा- राजेश प्रधान

प्रल्हाद कांबळे
Saturday, 24 October 2020

राज्य शासनास, पोलिस महासंचालक कार्यालयात व इतर पोलिस घटक कार्यालयातून होणाऱ्या पत्रव्यवहारात पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोलिस कर्मचारी असे संबोधण्यात येत होते.

नांदेड : पोलिस दलातील सर्व घटक प्रमुखांना व कार्यालयांना गृह विभागाकडून सुचना दिल्या असून यापूर्वी वापरात असलेला पोलिस कर्मचारी हा शब्दप्रयोग बंद करुन त्याऐवजी पोलिस अमलदार असा शब्दप्रयोग करावा. अशा सुचना पोलिस विभागातील घटकप्रमुखांना एका परिपत्रकाद्वारे शुक्रवारी (ता. २३) कळविले आहे. 

राज्य शासनास, पोलिस महासंचालक कार्यालयात व इतर पोलिस घटक कार्यालयातून होणाऱ्या पत्रव्यवहारात पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोलिस कर्मचारी असे संबोधण्यात येत होते. यात गहविभागाने बदल करुन त्याऐवजी आता पोलिस अंमलदार हा शब्दप्रयोग करावयाचा आहे. सर्व घटक प्रमुख यांना पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे. 

पोलिस कर्मचारी हा शब्दप्रयोग न करता पोलिस अंमलदार 

शासनास, पोलिस महासंचालक कार्यालयात व इतर पोलिस घटकातील कार्यालयात पत्रव्यवहार करताना पोलिस कर्मचारी हा शब्दप्रयोग न करता पोलिस अंमलदार असे शब्दप्रयोग करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करावे. त्यामुळे आता पोलिस कर्मचारी हा शब्दप्रयोग करण्याऐवजी नव्याने पोलिस अंमलदार असा शब्दप्रयोग करण्यात यावा असे परिपत्रक राजेश प्रधान यांनी राज्यातील सर्व घटक प्रमुखांना पाठविले आहे.

हेही वाचा सचखंड गुरुद्वाराच्या ‘हल्लाबोलसाठी उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी -

सोमवारपासून अनुकंपाधारकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

नांदेड - जिल्हा परिषद नांदेड येथील अनुकंपाधारकांवर मागील आठ महिन्यांपासून अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी अनुकंपा कृती समितीतर्फे सोमवार(ता. २६) ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व अनुकंपाधारक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अमरण उपोषणासाठी बसणार आहेत. कारण शासनाने वेळोवेळी अनुकंपा भरतीसाठी शासन निर्णय निर्गमित करूनसुद्धा जिल्हा परिषद नांदेड प्रशासनाने अनुकंपा भरती केली नाही.

प्रशासनाने अनुकंपाधारकांना वाऱ्यावर सोडले 

या संदर्भात अनुकंपा कृती समितीने वेळोवेळी पत्रव्यवहार करून विचारणा केली असता, आज करू, उद्या करू असे म्हणत प्रशासनाने अनुकंपाधारकांना वाऱ्यावर सोडले आहे. अनुकंपा भरतीविषयी शासनाने काढलेल्या परिपत्रकाला जि. प. नांदेड प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. विनंती करूनसुद्धा प्रशासन भरती करत नसल्यामुळे या सर्व गलथान कारभाराला कंटाळून शेवटी सोमवार, ता. २६ ऑक्टोबर रोजी अनुकंपा कृती समितीने अमरण उपोषण करण्याचा पर्याय निवडला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use the word police officer instead of police officer Rajesh Pradhan nanded news