Vande Bharat Express: नांदेड मुंबई ‘वंदे भारत’ सेवा सुरू; जालन्यापासून सुटणाऱ्या रेल्वेचा विस्तार वास्तवात
Nanded Mumbai Train: नांदेड ते मुंबई दरम्यान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ६१० किमी अंतर ही गाडी केवळ ९ तास ३० मिनिटांत पार करणार आहे.
नांदेड : जालना ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा विस्तार नांदेडपर्यंत करण्यात आला आणि मंगळवारपासून (ता. २६) तो वास्तवात आला. नांदेडसह परभणी जिल्ह्यातील प्रवाशांनी या सेवेचे स्वागत केले.