मी हक्काचा वाढेकरी, चिंता कशाची?

bhokar.jpg
bhokar.jpg


भोकर, (जि. नांदेड) ः नांदेड आणि भोकरच्या विकासासाठी लागणारा निधी खेचून आणला आहे. भोकरच्या जनतेनी मला भरपूर प्रेम दिल्यामुळे नेहमीच या भागासाठी झुकते माप असते. तालुक्यातील आरोग्य, रस्ते, सिंचन, नवीन इमारत बांधकामासाठी आतापर्यंत सुमारे दोनशे कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ही कामे मार्गी लागतील. मी तुमचा हक्काचा वाढेकरी असून चिंता करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

भोकर शहरातील विविध विकासकामे, नवीन इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (ता. २५) झाले. आढावा बैठकीनंतर बोलताना चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत हरलो; पण तुम्ही मला विधानसभेत भरपूर मतांची आघाडी देऊन आपले जिव्हाळ्याचे नाते अतूट असल्याचे सिद्ध केले. नांदेड, भोकरकडे नेहमी लक्ष असते. तालुक्यातील पिंपळढव तलाव, सुधा प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. भोकर ते रहाटी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. हा मार्ग सिमेंटचा करण्याचा मानस आहे.

किनवट ते म्हैसा रस्त्यावरील रखडलेला वळण रस्ता लवकरच पूर्ण होईल. न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभागाची नवीन इमारत उभारली जाणार आहे. नारवट येथे बांबू प्रकल्प तर भोसी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. आरोग्य विभागासाठी चार रुग्णवाहिका देण्याची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, जगदीश पाटील भोसीकर, विनोद चिंचाळकर, मुख्याधिकारी प्रियांका टोंगे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार भारत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

कामात कुचराई झाल्यास गाठ माझ्याशी
मराठवाड्यातून जाणाऱ्या महामार्गांची १८ कंत्राटदारांची कामे जवळपास फेल झाली आहेत. पावसामुळे राज्य रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. रस्त्याची कामे चांगली व्हावीत, यासाठी कंत्राटदारांनी काळजी घ्यावी. पहिले काम पूर्ण केल्याशिवाय दुसरे मिळणार नाही. कामात कुचराई केली तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशाराही मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. 

संपादन - स्वप्निल गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com