विक्की चव्हाण खून प्रकरणातील आरोपीला पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Monday, 14 September 2020

या प्रकरणातील सहभागी असलेल्या सात जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या काही आरोपींकडून तीन पिस्तुल व जीवंत काडतूस, खंजर जप्त केले.

नांदेड : नांदेड पोलिसांची झोप उडवून देणारा कुख्यात आरोपी विक्की चव्हाण याचा त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीने पिस्तुलने गोळी मारून निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणातील सहभागी असलेल्या सात जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या काही आरोपींकडून तीन पिस्तुल व जीवंत काडतूस, खंजर जप्त केले. मात्र या खूनातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. रविवारी (ता. २३) अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

आर्थिक देवाण- घेवाणीतून तसेच इतर कारणावरून दोन टोळ्यांमध्ये युद्ध सुरू झाले होते. यात ता. दोन ऑगस्ट २०२० रोजी एका टोळीचा म्होरक्या विक्की चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात काही महिन्यापासून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे.

हेही वाचा  तुम्ही बैठेकाम करता, तर मग ही बातमी वाचा... 

आरोपींचे कंबरडे मोडण्याची व त्यांची आर्थिक रसद बंद करण्याच्या सुचना

या टोळीतील सदस्यांनी खंडणी आणि जबरी चोरी करणे चालू केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी याबाबतीत शहरातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचे कंबरडे मोडण्याची व त्यांची आर्थिक रसद बंद व्हावी यासाठी कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यांना तात्काळ बंद करून सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. या पार्श्वभूमीवर विक्की चव्हाण याच्या खुनानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली. या फरार असलेल्या आरोपींना अटक केली.

मोहम्मद रफीक याला पोलिस कोठडी

रविवारी (ता. १३) यातील एक आरोपी मोहम्मद रफीक राहणार बालाजीनगर, नांदेड हा त्या परिसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यनंतर पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन बालाजीनगर भागात आपल्या गरी दबा धरुन बसलेल्या मोहम्मद रफीक याला अटक केली. त्याच्याकडून खंजर जप्त केली. त्याने विक्की चव्हाण खून प्रकरणात सामील असल्याची कबुली देऊन गुन्ह्यात वापरलेले खंजीर पोलिसांकडे सुपूर्द केले. या सराईत आरोपीला श्री. भारती यांनी विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे.

येथे क्लिक करानांदेड : जबरी चोरी करणाऱ्यांना पोलिस कोठडी -

सतरा पिस्तूल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मागील पाच महिण्यत शहर व जिल्ह्यात कारावाया करुन नेक गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून सतरा पिस्तुल व काही जीवंत काडतुस व अन्य घातक शस्त्र जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेने शहर व परिसरातील कुख्यात गुन्हेगार वावरण्याची ठिकाणी, अड्डे पिंजून काढून संबंधित गुन्हेगारांना जेरबंद केले. या कारवाईमुळे शहरातील मुख्य गुन्हेगारांचा बीमोड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky Chavan murder accused remanded in police custody nanded news