कुख्यात विक्की चव्हाणचा मुख्य मारेकरी कैलास बिगानियासह तिघांना अटक 

file photo
file photo

नांदेड : नांदेड शहर व परिसरात प्रचंड दहशत पसरवून पोलिसांची डोकेदुखी वाढविणाऱ्या कुख्यात विक्की चव्हाणचा खून कैलास बिगानीयाच्या टोळीने अत्यंत निर्दयपणे केला होता. त्यानंतर तो फरार होता. यातील जवळपास नऊ आरोपी अटक केली होती. मात्र कैलास बिगानीया हा अन्य काही साथिदारांसह फरार होता. या तिन्ही आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर त्यांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक आशिष बोराटे यांच्या पथकाने बुधवारी (ता. २१) रात्री शहराच्या पक्कीचाळ परिसरात केली. 

विक्की चव्हाण आणि कैलास बिगानीया यांच्यात टोळीयुध्द होते. या दोघांनीही अल्पवयीन युवकाना आपल्या टोळीत सहभागी करुन घेतले होते. या दोघांचे नेहमी खटके उडत असत. वर्चस्वाच्या वादातून विक्की चव्हाण याचा खून करण्याचे कट कारस्थान कैलास बिगानीया याने रचला. या घटनेच्या काही दिवस अगोदर विक्की चव्हाण याने कैलास बिगानियाच्या एका नातेवाईकसोबत वाद घातला होता. याचा राग मनात धरुन बिगानिया याने आपल्या काही साथिदारांना सोबत घेऊन विक्कीचा पाठलाग केला. 

गोदावरी नदीच्या परिसरात एका झुडपात त्याचा मृतदेह टाकून पसार झाले होते

ता. चार आॅगस्टच्या रात्री नऊच्या सुमारास विक्की चव्हाण हा विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रस्त्यावर असल्याची माहिती बिगानिया याला मिळाली. त्याने त्या ठिकाणी जावून सर्वप्रथम विक्की चव्हाणच्या गाडीला आपल्या कारचा धक्का दिला व खाली पाडले. एवढेच नाही तर त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून त्याला जायबंद केले. त्यानंतर त्याचा मृतदेह आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करुन पुरावा नष्ट करण्यासाठी पळवून नेला. मात्र पोलिसांना शहर व परसिरात नाकाबंदी केल्याने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. मात्र हस्सापूर शिवारात नेऊन गोदावरी नदीच्या परिसरात एका झुडपात त्याचा मृतदेह टाकून पसार झाले होते. हा मृतदेह ता. पाच आॅगस्ट रोजी सकाळी सापडला होता.

अखेर त्याचा खेळ खल्लास

ता. चार ऑगस्ट रोजी विकी चव्हाणचा खून करून आपली दहशत पसरवण्याचा कैलासला यश आले. मात्र त्याच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल झाला. यानंतर तो पसार झाला. त्याच्या काही साथीदारांना विमानतळ, नांदेड ग्रामिण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अटक केली. ते सध्या कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. कैलास व त्याचे इतर दोन साथिदार हे फरार असल्याने व तो अट्टल गुन्हेगार असल्याने पोलिसांना चकमा देत होता. पोलिस मात्र त्याच्या मागावरच होते. अखेर त्याचा खेळ खल्लास झाला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. या गुन्ह्यात यांच्यासह आतापर्यंत १२ जणांना अटक केली. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कौतूक 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्वत: आपले सहकारी फौजदार आशिष बोराटे, कर्मचारी हनुमंत पोद्दार, बजरंग बोडके, रवी बाबर, पद्मसिंह कांबळे, बालाजी तेलंग, गंगाधर कदम, विठ्ठल शेळके, बालाजी यादगीरवाड आणि चालक दादाराव श्रीरामे यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीवरुन पक्कीचाळ परिसरात सापळा लावला. मात्र पोलिस येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालून पुढे निघाले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांची दुचाकी पोलिस वाहनाने पाडली. यानंतर कैलास बिगानिया व त्याच्या दोन साथिदारांना अटक केली. पोलीस स्मृतिदिनी आपल्या पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे आणि इतवारा उपविभागाचे उपाधीक्षक धनंजय पाटील यांनी कौतुक केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com