esakal | Video- कोरोना : संकट गंभीर, मात्र परिस्थिती नियंत्रणात- डॉ. विपीन 
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

पोलिस व आरोग्य विभागाच्या मदतीने सुरू असलेले हे कोरोनाचे युद्ध आपण नक्कीच नांदेडकरांच्या बळावर जिंकणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केला. 

Video- कोरोना : संकट गंभीर, मात्र परिस्थिती नियंत्रणात- डॉ. विपीन 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचे संकट गंभीर असून मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोना बाधीत रुग्ण हे नवीन भागात आढळून येत नसल्याने नांदेडकरांसाठी दिलासादायक वृत्त आहे. परंतु ज्या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले त्या भागावर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. पोलिस व आरोग्य विभागाच्या मदतीने सुरू असलेले हे कोरोनाचे युद्ध आपण नक्कीच नांदेडकरांच्या बळावर जिंकणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केला.

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कोरोना पेट्रोल ही दुचाकी वाहने कन्टेनमेन्ट झोनमध्ये गस्त घालण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. देगलुर नाका हैदरबाग परिसरात बुधवारी (ता. १३) सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटरणकर यांनी दुचाकी वाहनांचे उद्घाटन केल्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार, डीवायएसपी धनंजय पाटील, अभिजीत फस्के, डॉ. सिद्धेश्‍वर धुमाळ, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे यांची उपस्थिती होती.  

नांदेड जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा नवीन रुग्ण नाही 

एक लाख तीन हजार १४२ व्यक्तींची तपासणी

अबचलनगर येथील ता. २६ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण काल मंगळवार (ता. १२) मे रोजी पूर्ण उपचारानंतर त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथून सुट्टी देण्यात आली आहे.

हेही वाचा नांदेडसाठी बुधवार ठरला दिलासादायक

एक लाख तीन हजार १४२ व्यक्तींची तपासणी

बुधवार (ता. १३) रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एक लाख तीन हजार १४२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील दोन हजार १३१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी एक हजार ८७९ स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून १५७ व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण ६३ रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा

पॉझिटिव्ह पाच मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

loading image