Video - माहूरगडावर श्री रेणुकादेवीची उत्साहात घटस्थापना

बालाजी कोंडे
Saturday, 17 October 2020

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मुळपीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील श्री रेणुकादेवीची विधीवत घटस्थापना शनिवारी (ता. १७ आक्टोंबर) दुपारी साडेबारा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्रीराम जगताप, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांच्या हस्ते करण्यात आली.  

माहूर, (जि. नांदेड) - नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर नवरात्र उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मुळपीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील श्री रेणुकादेवीची विधीवत घटस्थापना शनिवारी (ता.१७ आक्टोंबर) दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्रीराम जगताप, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

श्री रेणुकामातेच्या जयघोषाने नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. माहूर गडावर सकाळी सहा वाजता श्री रेणुकादेवीच्या पुजेस प्रारंभ करण्यात आला. श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्रीराम जगताप यांनी सपत्नीक देवीचा अभिषेक, पुजा करून घटस्थापना केली. कोरोना संसर्गामुळे यंदा प्रथमच मोजक्या पदाधिकारी आणि भक्तांच्या उपस्थितीत शासनाचे नियम पाळून घटस्थापना करण्यात आली. 

हेही वाचा - नवरात्रोत्सवाला सुरुवात, तरीही नांदेडच्या बाजारपेठेत शुकशुकाटच

यांची होती प्रमुख उपस्थिती
घटस्थापना करतेवेळी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार, तहसीलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर वरणगावकर, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त विनायकराव फांदाडे, विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त अरविंद देव, दुर्गादास भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे आदी उपस्थित होते.
                        
कुमारिका, सुवासिनी पूजन
घटस्थापनेपुर्वी मानाचे कुमारिका पुजन व सुवासिनी पुजन करण्यात आले. श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्रीराम जगताप, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. पौराहित्य वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी यांनी केले. त्यानंतर रेणुकादेवीला नैवैद्य दाखवून महाआरती करण्यात आली. तसेच मंदीर परिसरातील देवदेवताची पुजा, आरती करण्यात आली.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : नवरात्रोत्सवात ना दांडीया, ना सार्वजनिक कार्यक्रम, भक्तात नाराजगी

भक्ती रचना सांगीतिकचे विमोचन 
स्वरराज अक्षय दाभाडकर स्वरसाजीत श्री रेणुकादेवी भक्त कवी विष्णुदास महाराज रचित भक्ती रचना सांगीतिकचे विमोचन श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्रीराम जगताप आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Enthusiastic engagement of Shri Renuka Devi at Mahurgad, Nanded news