नांदेड : नवरात्रोत्सवात ना दांडीया, ना सार्वजनिक कार्यक्रम, भक्तात नाराजगी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 17 October 2020

मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यात शनिवार (ता. १७) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.

नांदेड : संबंध जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर टळावे व पूर्वीसारखेच दिवस यावे असे प्रत्येकाला वाटत आहे. मागील आठ महिण्यापासून माणूस माणसापासून दुरावला आहे. एवढएच नाही तर या कोरोनाचे सावट सणावरसुद्धा आले आहे. मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यात शनिवार (ता. १७) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रशासनाने नियम आणि अटी घालुन दिल्या आहेत. साध्या पद्धतीने येणारा प्रत्येक सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

भक्तांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात नांदेड जिल्ह्यात मंडळांनी चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती स्थापन केल्या नव्हत्या. त्याचबरोबर मिरवणुका न काढता गणरायला निरोप दिला होता. आता नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाने त्याच पार्श्वभूमीवर परवानगी दिली आहे. परंतु या काळात कुठेही दांडिया खेळता येणार नाहीत. त्याचबरोबर सार्वजनिकरित्या कार्यक्रम घेता येणार नाहीत. सार्वजनिक मंडळांनी या काळात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरे यासह इतर आजाराबाबत जनजागृती करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याला मंडळाकडूनही प्रतिसाद देण्यात येत आहे.

हेही वाचानांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी मंडळानी घ्यावी 

या काळात सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने पोलिस ठाणे स्तरावर शआंतता समितीच्या बैठका घेऊन दुर्गा मंडळाना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. चार फुट ऊंचीच्याच मुर्तीची प्रतिष्ठापणा करा असा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार मंडळांकडूनही चार फुटापेक्षा अधिक ऊंची असलेल्या दुर्गामुर्ती खरेदी केल्या जात नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी मंडळानी घ्यावी याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यावर्षी गणेशोत्सवाप्रमाणे कोणत्याही प्रकारचा थाटमाट न करता अत्यंत साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.

येथे क्लिक करा - गुड न्यूज :  नांदेड जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा -

या वर्षी फक्त ३० मंडळच 

देवीच्या मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक असू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. स्थापना करताना मिरवणुका न काढता मोजक्याच जणांच्या उपस्थितीत मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. सामाजिक अंतर पाळले जाणार आहेत. मंडळांनी यंदा सामाजिक उपक्रम दुर्गा मंडळ आणि गणेशोत्सव याप्रमाणे या काळात सार्वजनिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, कोरोना यौध्यांचा सन्मान, शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्ण आणि नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था यासह कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दरवर्षी ६५ मंडळाची स्थापना असते. या वर्षी फक्त ३० मंडळच नवरात्र उत्सव साजरा करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: No Dandiya, no public function during Navratri festival, displeasure among devotees nanded news