esakal | भारतीय शालेय खेळ महासंघाच्या महासचिवपदी विजय संतान; नांदेड जिल्ह्याचे भुमीपुत्र; मराठवाड्यास प्रथमच बहुमान

बोलून बातमी शोधा

file photo}

भारतीय शालेय खेळ महासंघ (एसजीएफआय) या राष्ट्रीय क्रीडा संस्थेवर महासचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. नांदेड व मराठवाड्यासाठी प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

भारतीय शालेय खेळ महासंघाच्या महासचिवपदी विजय संतान; नांदेड जिल्ह्याचे भुमीपुत्र; मराठवाड्यास प्रथमच बहुमान
sakal_logo
By
प्रा. इम्तियाज खान

नांदेड ः मागील अनेक वर्षांपासून राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे माहूर (जि. नांदेड) येथील भूमीपुत्र व सध्या पुणे येथे जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर कार्यरत विजय संतान यांची भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या भारतीय शालेय खेळ महासंघ (एसजीएफआय) या राष्ट्रीय क्रीडा संस्थेवर महासचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. नांदेड व मराठवाड्यासाठी प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

विजय संतान यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मराठवाड्यास हा बहुमान मिळाला आहे. सध्या पुणे जिल्हा अधिकारी तथा प्रभारी क्रीडा उपसंचालक म्हणून ते पुणे येथे कार्यरत आहेत. माहूर येथील शेतकरी (कै.) बापूरावजी संतान यांचे सुपुत्र विजय संतान यांनी जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथून आपल्या शारिरिक शिक्षणाचे पदवी व पदवीव्युतर शिक्षण पूर्ण केले. राज्याच्या क्रीडा विभागात रुजू होऊन गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्य केल्यानंतर पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून रुजू झाले. सध्या प्रभारी क्रीडा उप संचालकपदी ते कार्यरत आहेत.

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या आयोजित केल्या. २०१९ मध्ये केंद्र शासनाच्या खेलो इंडिया युथ या राष्ट्रीय स्पर्धा सक्षमरित्या आयोजित करण्यात विजय संतान यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रास प्रथम क्रमांक मिळाला होता. गरीब, होतकरू खेळाडूंना मदत करून त्यांना आपली प्रतिभा उंचावण्यात विजय संतान यांनी बहुमोल भूमिका गडचिरोली व पुणे इथे बजावली आहे. उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची भारतीय क्रीडा क्षेत्रात ओळख आहे. पुणे येथे एक लाख ७५ हजार शालेय विद्यार्थ्यांना ४५ खेळात समाविष्ट करून त्यांना वेबसाईटने जोडण्याचे उल्लेखनीय कार्य ही त्यांनी केले आहे.

त्यांच्या या यशाबद्धल क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, एनआयएस बॅडमिंटन प्रशिक्षक कलिमुद्दीन फारुकी, अनिल बंदेल, ईश्वर कदम, क्रीडाधिकारी सी. एस. स्वामी, नांदेड आॅलम्पिक असोसिएशनचे संस्थापक सचिव प्रा. इम्तियाज खान आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे