Vishnupuri Dam: ‘विष्णुपुरी’ ९७ टक्के भरले; गेट उघडणार; नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली; एका दिवसातच ५५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

Vishnupuri Dam Reaches 97% Capacity: नांदेडच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली असून, पाण्याची आवक कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Vishnupuri Dam

Vishnupuri Dam

esakal

Updated on

नांदेड: जुलैच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प शनिवारी दुपारी चारपर्यंत तब्बल ९७.०८ टक्के भरला आहे. त्यामुळे आगामी काळातील शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता पूर्णपणे दूर झाली आहे. प्रकल्पाच्या वरच्या बाजूने अद्यापही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, ती कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com