esakal | विष्णुपुरीच्या साठ्यात सर्वाधिक वाढ, सीना कोळेगाव शून्यावरच
sakal

बोलून बातमी शोधा

vishnupuri dam

विष्णुपुरीच्या साठ्यात सर्वाधिक वाढ, सीना कोळेगाव शून्यावरच

sakal_logo
By
मधुकर कांबळे

नांदेड: काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने मराठवाड्यातील मोठ्या धरणात उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना कोळेगाव वगळता सर्वच धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे. सर्वाधिक वाढ ही विष्णूपुरीमध्ये आहे. एक जूनपासून या धरणात ४८६.७५ दशलक्ष घनमीटर पाणी आले आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांत २३५५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात शुक्रवार (ता. १६) अखेर ७५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील येलदरीत ४९१ दशलक्ष घनमीटर, निम्न दुधनात १९० दशलक्ष घनमीटर, नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी ७८ दशलक्ष घनमीटर , निम्न मनारमध्ये ८६ दशलक्ष घनमीटर, उर्ध्व पेनगंगा ५२३ दशलक्ष घनमीटर, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वरमध्ये ३६ दशलक्ष घनमीटर, बीड जिल्ह्यातील माजलगाव ८० दशलक्ष घनमीटर , मांजरा ३१ दशलक्ष घनमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यतील निम्न तेरणा धरणात ४६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातीलच सीना कोळेगावमध्ये अजूनही उपयुक्त साठाच शिल्लक नाही.

शुक्रवार (ता. नऊ) अखेरीस मराठवाड्यातील ७५३ लघु प्रकल्पांपैकी ४६ प्रकल्प कोरडेठाक होते. त्यामध्ये लातूर उस्मानाबादमधील प्रत्येकी १५, बीडमधील ७ व औरंगाबादमधील ९ लघु प्रकल्पांचा समावेश होता. शुक्रवार (ता. १६) अखेर कोरड्या असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या ८ ने कमी झाली असून ती ४६ वरून ३८ वर आली आहे. त्यामध्ये बीडमधील ७, औरंगबादमधील ९, लातूरमधील १४ तर उस्मानाबादमधील ८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. उस्मानाबादमधील कोरड्या असलेल्या लघु प्रकल्पात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

हेही वाचा: २१ नखी जिवंत कासव अन् कुत्रा न दिल्याने लग्न मोडले!

आठही जिल्ह्यातील जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या शुक्रवार (ता. नऊ) अखेरीस ३०० होती ती शुक्रवार ( ता. १६ ) अखेर २६६ वर आली आहे. दुसरीकडे ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या १७ वर होती ती ४० वर पोहचली आहे. शुक्रवार (ता. नऊ) अखेरीस केवळ ३ मध्यम प्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा होता. ती संख्या शुक्रवार ( ता. १६ ) अखेर ८ प्रकल्पांवर पोहचली आहे. तर जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या १४ मध्यम प्रकल्पांची संख्या एक ने कमी होऊन १३ वर आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा: दिव्यांगांसाठी ‘सामाजिक न्याय’ कोसोदूरच

 1. एक जूनपासून आजपर्यंत वाढ (दशलक्ष घनमीटर)-

  विष्णुपुरी - ४८६ . ७५
  जायकवाडी - ११२.१७
  निम्न दुधना - १०१.३३
  येलदरी - ८५.१३
  सिद्धेश्वर - ५२.४६
  माजलगाव - ४०.७६
  मांजरा - ३.५२
  ऊर्ध्व पेनगंगा - १४०.७
  मानार - ४२.२२
  निम्न तेरणा - १०.६५
  सीना कोळेगाव - ००

loading image