esakal | सावधान:  हॅलो...मी बँकेतून बोलतोय, असे म्हणून खातेदाराला....

बोलून बातमी शोधा

file photo

क्क खातेदाराच्या खात्यातून एक लाख २३ हजार रुपये आॅनलाईन लंपास केले. हा प्रकार ता. सात आक्टोबर २०१९ पूर्णा रोड नांदेड व अंबरनाथ, मुंबई येथे घडला.

सावधान:  हॅलो...मी बँकेतून बोलतोय, असे म्हणून खातेदाराला....
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : हॅलो...हं... बोला... मी बँकेतून बोलत आहे. माझे बोलणे विजय बुक्तरे यांच्याशी होत आहे का ? हो म्हणताच समोरून तुमच्या ॲक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डची मुदत संपत आहे. हे कार्ड पुढे सुरु ठेवण्यासाठी आपले बँक खाते क्रमांक सांगा. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा असे म्हणून चक्क खातेदाराच्या खात्यातून एक लाख २३ हजार रुपये आॅनलाईन लंपास केले. हा प्रकार ता. सात आक्टोबर २०१९ पूर्णा रोड नांदेड व अंबरनाथ, मुंबई येथे घडला. चौकशीअंती शुक्रवारी (ता. १९) भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
शहराच्या पूर्णा रोडवर असलेल्या नविनवाडी (ता. नांदेड) येथील विजय निवृत्ती बुक्तरे (वय ३५) 
यांना ता. सात आॅक्टोबर रोजी नांदेड व अंबरनाथच्या ॲक्सीस बॅंक शाखेतून फोन आला. मी आपल्या ॲक्सीस बँकेतून बोलत आहे. आपल्याकडे असलेल्या क्रेडीट कार्डची मुदत संपत आहे. हे कार्ड पुढे सुरु ठेवण्यासाठी आपला बँक खाते क्रमांक सांगा. यानंतर विजय बुक्तरे यांनी विश्‍वासाने आपला बँक खआते क्रमांक सांगितला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारताच तोही त्यांनी लगेच सांगितला. 

हेही वाचाज्येष्ठता डावलून दिला सचिवाचा पदभार.....कुठे ते वाचा

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

जसाही ओटीपी क्रमांक त्यांनी सांगितला व फोन खाली ठेवत नाही तोच त्यांच्या बॅंक खात्यातील या दोन ठिकाणाहून बँक खाते हॅक करुन हॅकरने एक लाख २३ हजार १० रुपये काढल्याचा संदेश आला. दुपारी एक ते रात्री बारा वाजेपर्यंत ही रक्कम वेगवेगळ्या वेळी काढून घेऊन जवळपास सव्वा लाखाचा गंडा घातला. या प्रकरणाची चौकशी करुन विजय बुक्तरे यांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही बँकेत जावून तपासणी केली. यानंतर भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकरविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके करत आहेत.  

खंजर बाळगणारा अटकेत

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ ठाण्याचे पोलिस कर्मचारी राजकुमार पाटील हे गस्त घालत होते. यावेळी त्यांना माळटेकडी गुरूद्वारा समोरील पुलाखाली एका युवक संशयावरुन दबा धरुन बसलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ विनापरवाना खंजर सापडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शुक्रवारी (ता. १९) सांयकाळी सहाच्या सुमारास विमानतळ पोलिस ठाण्यात हजर केले. राजकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरुन त्या युवकावर गुन्हा दाखल केला. तपास पोलिस हवालदार श्री. लोखंडे करत आहेत.