
नांदेड : शहरातील रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना लूबाडण्याच्या घटना तशा काही नवीन नाहीत. मात्र आता तर चक्क महिलांच्या पर्स पळविणारी टोळी रुग्णालय परिसरात कार्यरत झाली की काय असा प्रश्न नातेवाईकांना पडत आहे. अशाच एका धनेगाव येथील महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी डॉक्टरलेन परिसरातील एका रुग्णालयातून पळविल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री घडली.
रूग्णाच्या नातेवाईकांनी लुबाडल्याचे किस्से भरपूर आहेत. बाहेरगावाहून आलेल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक आधीच त्रस्त असतात. त्यांना शहराची व्यवस्थित माहिती नसल्याने हे चोरटे त्यांना हेरतात. आमचाही रुग्ण येथेच पचार घेत असल्याचे सांगुन ते जवळीक साधतात. आणि हातोहात रुग्णांच्या नातेवाईकांच्या किंमती सामानावर डल्ला मारून पसार होतात. या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.
४५ हजाराच्या ऐवजाची पर्स लंपास
धनेगाव परिसरातील हनुमान सोसायटीत राहणारी एक महिला उपचारासाठी डॉक्टर लेनमधील एका खासगी रुग्णालयात आली होती. त्या पेशंटसोबत नात्यातील अन्य दोन महिला होत्या. रात्रीच्या वेळी या दोन्ही महिला झोपी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने पर्स घेऊन पोबारा केला. या पर्समध्ये एटीएम कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे तसेच सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. सकाळी जाग आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.
वजिराबाद ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा
याप्रकरणी शेख एजाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पुढील तपास वजिराबाद पोलीस करत आहेत. रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना थांबविण्यासाठी व्यवस्थापनाकडून काहीच खबरदारी घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत असल्याने ग्रामिण भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
येथे क्लिक करा - नांदेडमध्ये गुटखा माफियांची चलती
पोलिसांचा आवाहन
रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्यासोबत किंमती दागिणे आणु नये. तसेच जर आणले असतील तर त्याबद्दल काळजी घेऊन ते सांभाळावे. शक्यतो अनोळखी व्यक्तीसोबत बालु नये किंवा त्याच्यावर विश्वास टाकू नये. आपल्या आजूबाजूला कोण थांबले व त्याचे येथे काय काम आहे याची खात्री करावी. काही संशय आल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा रुग्णालय प्रशासनास कळवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.