esakal | मराठवाड्यात जलसंधारणाची कामे टाळली जातात; मात्र नांदेडातील नागदरवाडीने करुन दाखवले

बोलून बातमी शोधा

पाणीदार नागदरवाडी

मराठवाड्यात जलसंधारणाची कामे टाळली जातात; मात्र नांदेडातील नागदरवाडीने करुन दाखवले

sakal_logo
By
बा. पू. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : "खडकाळ जमिनीतूनही पाण्याच्या रुपाने आम्ही सोने उगवुन दाखवू .'अशी जिद्द नागदरवाडीच्या नागरिकांत आहे. माळेगाव, माळाकोळी दुष्काळग्रस्त भाग जिद्दीने पाणीदार बनू शकतो, हे दाखवून दिलंय जलनायक बाबुराव केंद्रे नागदरवाडीकर यांनी.

लोहा तालुक्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली (पर्जन्याधारित) म्हणजेच कोरडवाहू आहे. त्यामूळेच या शेतीला अनेक मर्यादा येतात. त्या दूर करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धन हा अतिशय चांगला पर्याय आहे. मूल्यवान पाणी आणि त्याइतकीच अमूल्य असलेली माती असे पाणी व माती यांचे संवर्धन करण्याचे स्वप्न बाबूराव केंद्रे या युवकाला पडले. प्रथमतः नागदरवाडी च्या पडीत जमिनीचा विकास व त्या माध्यमातून रोजगारांची संख्या वाढविणे, हा त्यांचा हेतू आहे. ज्यामूळे कृषी उत्पादनात वाढ तर होईलच, शिवाय मौल्यवान असलेल्या भूसंपत्तीचे रक्षण व सुधारणा होईल.

हेही वाचा - नांदेड : लॉयन्स क्लब व अन्नपूर्णाच्या वतीने अनेकांची रामनवमी गोड

हे मार्गदर्शक काम इतर गावांना प्रेरणा देत आहे

परिसरातील दोन हजार हेक्टर ओसाड भूक्षेञावर जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत. शेतीसाठी गावात 69 विहिरी दोन वर्षापूर्वीच बांधण्यात आल्या आहेत. काही दिवसापूर्वी नागदरवाडी येथे दोन नवीन विहरी 50 फूट खोल खोदण्यात आल्या. त्या विहिरी आज एप्रिल महिन्यात तुडुंब भरल्या आहेत. सर्व 71 विहिरीमधून शेतीसाठी सिंचन सुरु आहे. या भागातील शेतकरी फळबागा, भाजीपाला, रब्बी हंगामातील काही पिक घेत आहेत. विहिरीतील पाणी कमी होत नाही. हे मार्गदर्शक काम इतर गावांना प्रेरणा देत आहे.

मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले जात आहे

मराठवाड्यातील भूस्तर रचना खराब आहे अशी सबब सांगून आज मराठवाड्यात जलसंधारणाची कामे टाळली जात आहेत. हीच जलसंधारणाची कामे न होण्याची मोठी शोकांतिका आहे. मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले जात आहे. असे बाबुराव केंद्रे संगतात. तरुण पिढीने जलसंधारणाच्या कामासाठी समाजाला नवी दिशा द्यावी. नागदरवाडी येथे श्री गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय व प्रा. उपेंद्र कुलकर्णी यांच्या सहकार्याने अद्यावत अश्या प्रशिक्षण केंद्राची इमारत पूर्णत्वास येत आहे.

आपले गाव पाणीदार करण्याची तीव्र इच्छा आहे

"ज्या युवकांना व शेतकऱ्यांना आपले गाव पाणीदार करण्याची तीव्र इच्छा आहे त्यांनी नक्की एकदा नागदरवाडी (तालुका लोहा )येथील जलसंवर्धनाच्या कामाला भेट द्यावी. जलप्रशिक्षणाचे केंद्र लवकरच राळेगणसिद्धी, हिवरेबाजार सारखं बनेल यात शंकाच नाही."

- दिपक मोरताळे, जलनायक. नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे