Vishnupuri Dam: नांदेडच्या ‘विष्णुपुरी’तून पाण्याचा विसर्ग थांबविला; आता साठा ९६ वरून ५९ टक्क्यांवर
Nanded News: विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला असून साठा ९६ टक्क्यांवरून ५९ टक्क्यांवर आला आहे. गोदावरी नदीला दिलेल्या विसर्गामुळे पूरस्थिती आली होती; मात्र आता स्थिती नियंत्रणात आहे.
नांदेड : पावसाचा जोर कमी झाल्याने, पाण्याची आवक घटल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे चारही दरवाजे सोमवारी (ता.२८) दुपारी चारला बंद करून विसर्ग थांबविण्यात आला. या प्रकल्पातून २६ जुलैपासून मोठ्या प्रमाणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.