Water Shortage : नांदेड जिल्ह्यात २७९ गावांमध्ये टंचाईच्या झळा

Water Shortage : उन्हाच्या तीव्रतेसोबतच जिल्ह्यावर दिवसेंदि‍वस पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील भोकर, हिमायतनगर, नायगाव, मुखेड, लोहा, किनवट या तालुक्यांतील २७९ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा अधिक आहेत.
 water shortage
water shortagesakal

नांदेड : उन्हाच्या तीव्रतेसोबतच जिल्ह्यावर दिवसेंदि‍वस पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील भोकर, हिमायतनगर, नायगाव, मुखेड, लोहा, किनवट या तालुक्यांतील २७९ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा अधिक आहेत.

प्रशासनाकडून ९ गावे, २६ वाड्यांवर ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर ३२५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

चांगला पाऊस पडेपर्यंत पुढील काही दिवस प्रशासनासाठी कसोटीचे राहणार आहेत, जिल्ह्यात आठवडाभरापासून उष्णतेची लाट आहे.

त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. दिवसभरच नाही, तर रात्रीच्या तापमानातही वाढ होत असल्याने उकाडा असह्य होत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढल्यामुळे जलसाठ्यात कमालीची घट होत असल्याचे चित्र आहे. पावसाळा जवळ येताच पाणीटंचाईची तीव्रता अधिकच जाणवत आहे.

नांदेड पाटबंधारे विभागाच्या ३० मेच्या साप्ताहिक पाणीपातळी अहवालानुसार, जिल्ह्यातील मध्यम व लघू १०४ प्रकल्पांत १४५.१४ दलघमी उपयुक्त साठा असून, त्याची टक्केवारी १९.९३ आहे. नांदेडकरांची तहान भागविणाऱ्‍या गोदावरी नदीवरील काळेश्वर येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात सध्या १५.१० दलघमी उपयुक्त (१८.६९ टक्के) साठा आहे.

उन्हाच्या तीव्रतेने बाष्पीभवन वाढले असून, मध्यम, लघू प्रकल्पातील साठा झपाट्याने घटला आहे. बोअर आटले असून, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे वाडी, वस्ती, तांड्यांवर हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

मागीलवर्षीपेक्षा यंदा उन्हाच्या झळा सर्वाधिक जाणवत आहेत. गतवर्षी केवळ सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. महिलावर्गाचा संपूर्ण दिवसच पाणी आणण्यात जात आहे, तर मुलांच्या उन्हाळी सुट्याही पाण्यात जात असल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय टँकर-

अधिग्रहण (कंसात विहिरींची संख्या)

प्रशासनाकडून भोकर येथे ३५ टॅंकर तर ३७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मुदेखड ३ (४),

उमरी ७ (८),

हदगाव ३६ (२४),

हिमायतनगर १२ (१६),

नायगाव २० (४९),

मुखेड ४० (४०),

कंधार २७ (३४),

लोहा ५१ (६४),

किनवट १४ (२०),

माहूर १५ (१९),

नांदेड ८ (८),

अर्धापूर २(२)

असे एकूण २७० गावांमध्ये ३२५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर मुखेडमधील ४ व वाड्या १४, कंधार २ गावे व ३ वाड्या व माहूरमध्ये एका गावात असे एकूण ३५ टँकर सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com