बुधवारी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर 

शिवचरण वावळे
Wednesday, 24 June 2020

नव्याने आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण गुलजारबाग येथील ६५ वर्षीय रुग्ण तर दुसरा ६७ वर्षीय रुग्ण देगलुरनाका परिसरातील आहेत. दोन्ही रुग्णास विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले

नांदेड : मंगळवारी (ता. २३) रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता. २४) ४१ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७ अहवाल निगेटिव्ह, दोन अनिर्णित तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

नव्याने आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण गुलजारबाग येथील ६५ वर्षीय रुग्ण तर दुसरा ६७ वर्षीय रुग्ण देगलुरनाका परिसरातील आहेत. दोन्ही रुग्णास विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३२३ इतकी झाली असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले.   

हेही वाचा- नांदेड ब्रेकींग : दूर्मीळ खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी जेरबंद​

२४५ व्यक्ती कोरोनातून बरे 

मंगळवारी (ता. २३) कोरोना आजारातून सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील एक व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील पाच बाधित तसेच औरंगाबाद येथील संदर्भित झालेल्या एका बाधित व्यक्तीचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकूण २४५ व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ ४० अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी २८ अहवाल निगेटिव्ह तर चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

दोन महिला दोन परुषांची प्रकृती गंभीर

आतापर्यंत २२३ बाधितांपैकी २४५ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. उर्वरित ६४ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. त्यात वय ५० व ५२ वर्षाच्या दोन स्त्रिया व ५२ आणि ५४ वर्षाच्या दोन पुरुषांचा यात समावेश असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले. 

हेही वाचा- धक्कादायक ! ‘ते’ दोघे अखंड प्रेमात अन्... ​

सेतू आॅप डाउनलोड करण्याचे अवाहन

नांदेड जिल्ह्यात ६४ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून सहा बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करुन घ्यावा. जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wednesday Added Two Positive Patients Nanded News