esakal | खासगी बस मालकांच्या काय आहेत मागण्या...?  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लॉकडाउनचा फटका खासगी बस चालक, मालक व त्यावर आधारीत असलेल्या सर्वच जणांना बसला आहे. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी आम्हाला काही मदत करा व यासह आदी मागण्या ट्रॅव्हल्स संघटनेच्या वतीने प्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहेत.

खासगी बस मालकांच्या काय आहेत मागण्या...?  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. त्यात हातावर पोट असलेल्या कामगारावर तर उपासमार आली आहे. या लॉकडाउनचा फटका खासगी बस चालक, मालक व त्यावर आधारीत असलेल्या सर्वच जणांना बसला आहे. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी आम्हाला काही मदत करा व यासह आदी मागण्या ट्रॅव्हल्स संघटनेच्या वतीने प्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहेत.

कोरोना निर्बंधामुळे खासगी वाहतूकदार यांचे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी नांदेड ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने केले आहे. कोवीड-19 च्या निर्बंधांमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजलेला आहे. प्रवासी बस वाहतूक ता. १४ मार्चपासून बंद आहे. त्यामुळे वाहतूकदारांची आवक संपूर्णपणे बंद झालेले असून आमच्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष अवलंबून असलेले व्यवसाय सुद्धा ठप्प झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या व्यवसायात आवश्यक असलेले चालक, क्लिनर तसेच कार्यालयीन कर्मचारी इत्यादी वर्गालासुद्धा आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. यासाठी आमच्या काही मागण्या आहेत त्या शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा‘या’ भागातील पन्नास वर्षावरील नागरिकांची होणार तपासणी

या आहेत मागण्या

ँ बस मालक सर्वात जास्त रोड टॅक्स भरतात. त्यामुळे आम्हाला किमान एक वर्षाचा रोड टॅक्स माफ करण्यात यावा.
ँ कारण यापुढे किमान सहा महिने तरी आमचा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी कालावधी लागेल.
ँ बसेसचा सहा महिन्याचा इन्शुरन्स कालावधी वाढवून देण्यात यावा.
ँ पुढील काळात सोशल डिस्टन्स पाळावे लागणार असून ५० टक्के प्रवासी घेता येतील त्यानुसार सरकारने रोड टॅक्स सुद्धा ५० टक्के घ्यावा.
ँ बँकांचे कर्जावरील सहा महिन्यांचे व्याज माफ करण्यात यावे.
ँ बस कार्यालयातील कामगार चालक, क्लिनर यांच्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी.
ँ किमान एक वर्ष जीएसटी कर माफ करण्यात यावा.
ँ बस कर्मचाऱ्यांना कोरोना यौद्धा घोषित करून ५० लाखाचा विमा संरक्षण जाहीर करण्यात यावा.
ँ लक्झरी बस मालकांचा व्यवसाय तारण्यासाठी बस वाहतूकदारास मदतीचे आर्थिक पॅकेज सरकारने जाहीर करावे.
ँ आपल्या शेजारील इतर राज्यांमध्ये काही मागण्या पूर्ण देखील झाल्या आहेत. ज्यात गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांमध्ये सहा महिन्याचा कालावधी रोड टॅक्स पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे. आमच्या मागण्यांकडे लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी नांदेड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी केली आहे.