esakal | ‘या’ भागातील पन्नास वर्षावरील नागरिकांची होणार तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

NND08KJP02.jpg

शहरातील देगलूर नाका भागातील हेमतनगर, तुराबनगर, मिल्लतनगर, गुलजार बाग, उमर कॉलनी या भागात कोरोना बाधित्यांची संख्या अधिक वाढत असल्याबाबत चर्चा झाली. कोरोना बाधित व्यक्तीच्या संबंधात आलेल्या नागरिकांची माहिती घेण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

‘या’ भागातील पन्नास वर्षावरील नागरिकांची होणार तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील देगलूर नाका भागातील रहेमतनगर, तुराबनगर, मिल्लतनगर, गुलजार बाग, उमर कॉलनी या भागात कोरोना बाधित्यांची संख्या अधिक वाढत असल्यामुळे या भागातील पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांची मनपाच्या आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
महापालिकेमध्ये सोमवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार, उपायुक्त (आरोग्य) अजितपालसिंग संधू, उपायुक्त (प्रशासन) सुधीर इंगोले, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बैस, महापालिकेचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, डॉ. बदियोदिन, सहाय्यक आयुक्त रितेश बैरागी यासह सर्व क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील ठराविक भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. 

हेही वाचा....अबब...पिककर्जासाठी अर्जाचा पाऊस....कुठे ते वाचा

ठराविक भागातील होणार तपासणी
शहरातील देगलूर नाका भागातील हेमतनगर, तुराबनगर, मिल्लतनगर, गुलजार बाग, उमर कॉलनी या भागात कोरोना बाधित्यांची संख्या अधिक वाढत असल्याबाबत चर्चा झाली. कोरोना बाधित व्यक्तीच्या संबंधात आलेल्या नागरिकांची माहिती घेण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. कंटेनमेंट झोनमधील फक्त जीवनावश्यक वस्तूचे दुकान चालू ठेवण्याबाबत तसेच कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असलेल्या भागातील आजारी व्यक्तीची माहिती घेण्याबाबत निर्देशीत करण्यात आले. यात वयस्कर नागरिकांची आरोग्य तपासणी मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्याबाबत निर्देश डॉ. विपीन यांनी दिले. 

हेही वाचलेच पाहिजे..... शेतकऱ्यांना पावसासह कर्जाची प्रतिक्षा...कुठे ते वाचा

एन-९५ मास्क पुरवठा करण्याच्या सूचना
आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्क पुरवठा करण्याच्या सूचना मनपा आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी रुग्ण आढळून येत असलेल्या भागातील मनपा सदस्य व सदस्यांचे प्रतिनिधी यांच्या समवेम महापालिकेत बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. लहाने पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पन्नास वर्षांपेक्षा अधीक वय असलेल्या नागरिकांनी मनपाच्या आरोग्य पथकाद्वारे तपासणी करून घ्यावी. नागरिकांना आरोग्याच्या काही तक्रार असल्यास घाबरून न जाता मनपाच्या आरोग्य पथकास माहिती द्यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. विपीन यांनी केले. 

नियम मोडणाऱ्यांना ४२ हजार रुपयांचा दंड
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नियमावली लागू केली आहे. यांच्या आदेशाने शहरात विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सहा पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाकडून सोमवारपर्यंत (ता. आठ) ४२ हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सूचना

महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केलेल्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपायुक्त विलास भोसीकर, उपायुक्त सुधीर इंगोले यांच्या नियंत्रणाखाली पथक प्रमुख वसंत कल्याणकर, आर. के. वाघमारे, सुधीरसिंह बैस यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी दंड वसुलीची कारवाई केली. यात पथक क्रमांक दोनकडून अडीच हजार, पथक क्रमांक चार कडून ३८ हजार सातशे व पथक क्रमांक सहाकडून चौदाशे असे एकूण ४२ हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील नागरिकांनी बाहेर पडताना तोंडावर मास्क अथवा स्वच्छ रुमालचा वापर करावा, दुकानदारांना कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार देण्यात आली. त्याचे पालन कराव्यात असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 

loading image