esakal | काय म्हणता ? खरचं पैनगंगा नदीवर भगवान परशुरामानी मनुष्यबाण मारुन सहश्रकुंडाची निर्मिती केली...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पैनगंगा नदीवर भगवान परशुरामानी मनुष्यबाण मारुन सहश्रकुंडाची निर्मित केली. अशी धार्मिक आख्यायिका.

काय म्हणता ? खरचं पैनगंगा नदीवर भगवान परशुरामानी मनुष्यबाण मारुन सहश्रकुंडाची निर्मिती केली...वाचा सविस्तर

sakal_logo
By
गंगाराम गड्डमवार

ईस्लापुर ( जिल्हा नांदेड ) : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ईस्लापुर गावापासुन उत्तर दिशेला चार किलोमीटर मराठवाडा आणि विदर्भाच्या सरहद्दीवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर भगवान परशुरामानी मनुष्यबाण मारुन सहश्रकुंडाची निर्मित केली. अशी धार्मिक आख्यायिका असली तरी खरोखरच या पैनगंगा नदीवरील सहश्रकुंड धबधब्यात मात्र निसर्गाने सौंदर्याची सहस्त्र हातांनी उधळण केली असल्याने या ठिकाणी तिच्या सहस्त्रधारांनी अंत नसलेल्या दगडी पाषानी आकर्षित शिळाच्या खोलवर असलेल्या कुंडात अगदी स्वच्छपणे स्व: ताला झोकुन देत असलेले नयनरम्य दृष्य निश्चितच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.

या पैनगंगा नदीतिरावर पुरातन काळाचे हेमाडपंथी शिवमंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरल्या जावून हजारों भाविक स्नानाचा लाभ घेऊन देवाचे दर्शन घेतात. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलगंणा राज्याच्या कानाकोपऱ्यातून तिर्थक्षेत्र माहूर दर्शनासाठी आलेले पर्यटक व भाविक आकर्षित सहश्रकुंड धबधबा पाहण्यास आवर्जुन भेट देतात. पावसाळा आणि हिवाळ्यात नदीला भरपूर पाणी असल्याने तेव्हा या धबधब्याचे सौंदर्य कांही औरच असते. तसेच या सहश्रकुंडाच्या पाषानी शिळाचा नजराना मनाला आकर्षित करणारा आहे.

हेही वाचा - परभणी : जिंतूर तालुक्यात ठेका नाही पण बोटीद्वारे वाळू उपसा सुरुच, कुठे आहे महसुल पथक ?

परराज्यातून निसर्गरम्य धाबा पाहण्यासाठी गर्दी

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलगंणा राज्यातून हा निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटक, भाविकांसह शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने या ठिकाणी फार मोठी वर्दळ असते. पण शासनाच्या वतीने आजपर्यंत पर्यटकांना थांबण्यासाठी विश्रामगृह, भोजनालय. शौचालय अशा विविध नागरी सुविधा पर्यटकांना उपलब्ध नसल्याने गैरसोईला तोंड देण्याची पाळी येत आहे. शासनाने याची वेळीच दखल घेवून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image