esakal | Video : नृत्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीत काय आहे महत्त्व?, ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

सर्वसामान्य भाषा व्यवहाराच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या, खोलवरच्या भावनांना आणि स्थायीभावांना संक्रांत करण्यासाठी वापरली जाणारी प्रतीके म्हणजे सर्व कलात्मक प्रयत्न होत. धर्माप्रमाणेच मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलेली एक क्रिया म्हणजे कला. संपर्क व संवाद साधणे ही मानवाची मूलभूत गरज आहे. संपर्क साधनांच्या अभावी मानवाच्या संवेदना लोप पावतील व तो एकतर पशूच्या पातळीवर पोहोचेल किंवा नष्ट होईल. कला ही अत्यंत खोलवरची आणि टिकाऊ अशी संपर्क क्रिया आहे.

Video : नृत्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीत काय आहे महत्त्व?, ते वाचाच

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : सर्वसामान्य भाषा व्यवहाराच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या, खोलवरच्या भावनांना आणि स्थायीभावांना संक्रांत करण्यासाठी वापरली जाणारी प्रतीके म्हणजे सर्व कलात्मक प्रयत्न होत. धर्माप्रमाणेच मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलेली एक क्रिया म्हणजे कला.

संपर्क व संवाद साधणे ही मानवाची मूलभूत गरज आहे. संपर्क साधनांच्या अभावी मानवाच्या संवेदना लोप पावतील व तो एकतर पशूच्या पातळीवर पोहोचेल किंवा नष्ट होईल. कला ही अत्यंत खोलवरची आणि टिकाऊ अशी संपर्क क्रिया आहे.

सामान्य माणूस संभाषण व कृती यांच्याद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, तर कलावंत आपल्या प्रतीकांद्वारा. मानवी स्वभाव सारखा असला, तरी त्यात व्यक्तिपरत्वे बदल होत असतात. तिव्रतेने जाणवलेल्या भावना अगदी प्रभावी तऱ्हेने संक्रांत केल्यावरही क्षणिक टिकतात आणि नंतर बदलतात व नाश पावतात. तेव्हा कलावंत सुनिश्चित रूपे व प्रतीके यांची निवड करतो. त्यात भावना बद्ध होतात आणि विविध कालखंडात प्रतिसाद मिळविण्याइतका टिकाऊपणा त्यांना लाभतो.

हेही वाचा - कोरोनाची करणी...खरिपाची कशी होईल पेरणी

लोकनृत्य प्रकार आणि परंपरा
प्रादेशिकदृष्ट्या जनसामान्यांमध्ये, विकसित झालेले आणि परंपरेने चालत आलेले नृत्य म्हणजे लोकनृत्य. पारंपरिक नृत्य, अपरिष्कृत नृत्य, आत्मभानविरहित नृत्य, समूहाने संरचना केलेले नृत्य इत्यादी नावांनी ते संबोधले जाते. पारंपरिक लोकजीवनाचे प्रतिबिंबच या लोकनृत्यांतून उमटलेले दिसते. भारतातील अनेक फिरस्त्या जमाती प्रामुख्याने व्यवसाय म्हणून जे नृत्य करतात, ते लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. ग्रामीण लोक, आदिवासी निरनिराळ्या उत्सवप्रसंगी नृत्य करून जो आनंद अनुभवतात तेही लोकनृत्यच असते.

लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य

साधेपणा हे लोकनृत्याचे मुख्य वैशिष्ट्य. लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य यांच्यातील फरक विचारात घेता शास्त्रीय नृत्याला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. शास्त्रीय नृत्यातील रचनाकौशल्य, कलात्मकता, सुसूत्रता इत्यादी वैशिष्ट्ये लोकनृत्यांतूनही प्रत्ययास येतात. आदि नृत्य आणि लोकनृत्य यांमध्येही फरक आहे. आदिलोक नृत्य हे समूहाचे असते आणि पुरुष आणि स्त्रिया यांमध्ये ते स्वतंत्ररित्या विभागलेले असते. लोकनृत्य मात्र पुरुष आणि स्त्रिया अशा दुकलीतून आविष्कृत होत असते.

हेही वाचा- अत्यावश्यक साधनांची साठेबाजी, काळाबाजार केल्यास कारवाई

लोककलेची समृद्ध परंपरा
भारतात लोकनृत्याची  समृध्द परंपरा असून प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे लोकनृत्य प्रकार आहेत. त्यातून त्या-त्या प्रादेशिक संस्कृतीची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित होत असतात. राजस्थानातील चक्रीनृत्य, घूमरनृत्य, कलबेलियानृत्य; उत्तर प्रदेशमधील चारकुला नृत्य, मयुरनृत्य, रासलीला; आसाममधील बिहू नृत्य, त्रिपुरातील होजागिरी नृत्य; महाराष्ट्रातील कोळीनृत्य, लावणीनृत्य, धनगरी गजेढोल नृत्य, तारपानृत्य इत्यादी लोकनृत्यप्रकार हे स्थलकाल-सापेक्ष, रससापेक्ष, संप्रदायसापेक्ष आहेत.

लोककला महोत्सवांचे होतेय आयोजन
लोकनृत्य ही व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहांची प्रथमत: केवळ स्वत:साठीच झालेली निर्मिती असते. ती दर्शकांसाठी किंवा विशिष्ट लोकनृत्यांच्या लोकप्रियतेसाठी झालेली निर्मिती नसते. दुसऱ्या टप्प्यात ती लोकनृत्ये प्रेक्षकांसाठी दर्शनीय होतात. प्राचीन काळापासून लोकांच्या भावनात्मक विचारात्मक काव्याचे स्वरूप म्हणजे लोकसंगीत होय. अभिजात शास्त्रीय शैली खेरीज आढळणाऱ्या महाराष्ट्रातील नृत्य परंपरेमध्ये लोक नृत्याचा समावेश होतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन पिढीला लोकनृत्य शैलींचा, ग्रामीण संस्कृतीचा परिचय व्हावा या हेतूने प्रमुख शहरांमध्ये लोककला महोत्सव देखील आयोजित केले जात आहे.

ग्रामीण साहित्य लोककला
लोकनृत्य ही आजच्या पिढीसाठी संशोधकाचा नवीन विषय झाला आहे. याबाबतीत स्वतंत्रपणे विद्यापीठीय स्तरावर शासनाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत विशेषतः पीएचडीच्या या प्रबंधाच्या रूपाने संशोधन देखील केले जातात. महाराष्ट्र हा प्रांत सुद्धा लोककला व सांस्कृतिक समृद्धता दर्शवणारा आहे.

येथे क्लिक कराच - आनंदवार्ता : कोट्याहून परतलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटीव्ह

कोकणातील कोळी नृत्य असेल किंवा ढोलाचा नाच, तांबोळी नाच, काठ्यांचा नाच, तारपी नृत्य, गोव्याचा नाच, सलामीचा नाच, रथाचा नाच, कडकलक्ष्मी डेरा नृत्य, गौरी शेतकरी नृत्य, धनगर नृत्य, वाघ्या मुरळी, लावणी, बतावणी, जोगती नृत्य