esakal | सराफावर धाडशी दरोडा टाकणारा विरेंद्रसिंग उर्फ विरा कोण आहे? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आरोपी विरेंद्रसिंग उर्फ विरा याने सराफाच्या डोक्यावर खंजर मारुन त्यांना जखमी केले होते. दोन दिवसांपासून तो आफल्या साथीदारांसह फरार आहे.

सराफावर धाडशी दरोडा टाकणारा विरेंद्रसिंग उर्फ विरा कोण आहे? वाचा...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या दत्तनगर भागात बुधवारी (ता. २९) भरदुपारी सराफा दुकानावर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. यावेळी आरोपी विरेंद्रसिंग उर्फ विरा याने सराफाच्या डोक्यावर खंजर मारुन त्यांना जखमी केले होते. दोन दिवसांपासून तो आफल्या साथीदारांसह फरार आहे. नुकतेच त्याला अमरावती कारागृहातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामिनावर सोडण्यात आले होते. 

सध्या कोरोनाने सर्वत्र पाय पसरले आहेत. या आजाराची अनेकांना लागन झाली. तर काहींचा मृत्यू ही झाला. या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. त्यामुळे काही गंभीर गुन्ह्यातील आरोपींना वगळून साध्या शिक्षा किंवा कच्च्या कैद्यांना कारागृहातून जामीनावर सोडण्याचा निर्णय राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतला. आणि अनेक कारागृहातील कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. 

हेही वाचा - कंधारमध्ये का केली महिलेनी आत्महत्या? वाचा सविस्तर...

पॅरोल रजा घेऊन एक महिण्यापूर्वी बाहेर पडला होता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रियेत स्थिरता मिळत असल्याचा फायदा घेत अनेक गुन्हेगारांनी शिक्षा भोगत असतानाही जेलमधून बाहेर निघण्याकरिता पॅरोल रजेवर सोडण्यात आले. अशाच जामिनावर नांदेड पोलिसांच्या दप्तरी गंभीर गुन्हे असलेला शहिदपूरा भागातील विरेंद्रसिंग उर्फ विरा बसुरसिंग सरदार हा पॅरोल रजा घेऊन एक महिण्यापूर्वी बाहेर पडला होता. बाहेर पडलेल्या गुन्हेगारांनी शहरात पुन्हा आपली दहशत निर्माण करण्याकरिता लुटमार सुरु केली आहे. विरेंद्रसिंग यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसह बुधवारी (ता. २९) शहरातील दत्तनगर परिसरात स्वामी समर्थ ज्वेलर्स हे दुकान भरदिवसा दुकान मालकास खंजरने मारुन जखमी करुन दिडशे ग्राम वजनाचे सोन्याचे दागिणे व नगदी १० हजार रुपये असा सहा लाख ८५ हजार रुपयाचा ऐवज जबरीने लुटला होता. त्यानंतर आलेल्या दुचाकीवरुन तिन्ही चोरटे पसार झाले होते. 

शिवाजीनगरसह अन्य ठाण्यात गंभीर गुन्हे 

विरेंद्रसिंग उर्फ विरा सरदार याच्यावर नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर. यावेळी सदरील आरोपीला शिवाजीनगर पोलिस स्थानकामध्ये हजेरी लावण्यास सांगितले होते. परंतु त्याने एकही दिवस हजेरी लावली नाही. न्यायालयीन आदेशाची पायमल्ली केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर तो अमरावती येथे एका नातेवाईकाकडे निघून गेला. परंतु तो नातेवाईकाकडे गेल्यानंतर ता. १२ जुन २०२० रोजी दशरथ अशोकराव विजयकर (वय २७) राहणार महाजनपुरा अमरावती याच्यावर साथीदारांना सोबत घेऊन प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिस ठाणे खोलापुरी (जिल्हा अमरावती) येथे प्राणघातक हल्ला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजेंद्रसिंग उर्फ विरा यास अटक केली होती. तो सध्या अमरावती कारागृहात स्थानबध्द होता. 

येथे क्लिक कराकोरोना : नांदेड जिल्ह्यात दीड लाख लोकांचे सर्वेक्षण

सध्या विरासह त्याचे तीन्ही साथिदार पोलिसांच्या हाती आले नाहीत

जामिनावर सुटून बुधवारी नांदेड येथे शिवाजीनगरच्या हद्दीत असलेल्या ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा टाकला. दुकानमालक जखमी केले व तेथून तो फरार झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र सध्या विरासह त्याचे तीन्ही साथिदार पोलिसांच्या हाती आले नाहीत. स्तानिक गुन्हे शाखा, शिवाजीनगर पोलिसांचे तीन पथक शहर व बाहेर जिल्ह्यात रवाना करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.  विरेंद्रसिंग उर्फ वीरा याला पकडणे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.