धर्माबादेत कोण होणार सभापती! करखेलीकरांचा राजीनामा; बाजार समिती सभापतीसाठी राजकीय डावपेचांना गती

२०१९ च्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकित भाजपाकडून सभापती गणेशराव पाटील करखेलीकर व राजू पाटील बोळसेकर हे दोघेच विजयी झाले.
धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती
धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती (Apmc dharmabad news chairman) गणेशराव पाटील करखेलीकर यांनी सभापती पदाचा राजीनामा प्रभारी जिल्हा उपनिबंधक अनिल चौहान (Ddr Anil chouhan) यांच्याकडे सुपूर्द केल्याने नूतन सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? याचे औत्सुक्य धर्माबादकरांना पडले असून बाजार समितीतुन भाजपला व्हाईटवॉश देण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण कोणती राजकीय गुगली टाकतात. हे अद्याप तरी स्पष्ट झाले नसून भाजपची (Bjp) कमांड यावेळी कोणत्या नेत्याकडे राहील याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. Who will be the Speaker in Dharmabad! Karkhelikar's resignation; Speed up political maneuvers for market committee chairman

२०१९ च्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकित भाजपाकडून सभापती गणेशराव पाटील करखेलीकर व राजू पाटील बोळसेकर हे दोघेच विजयी झाले. मतदारांनी करखेलीकर यांच्या पॅनलला स्पष्टपणे नाकारले तरीही तद्नंतर घडलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर सभापती पदाचा बहुमान करखेलीकर यांनी राखून ठेवला होता. त्यावेळी माजी आमदार गोरठेकर समर्थक आठ संचालक निवडून आले होते. त्यापैकी सात जणांनी करखेलीकर यांच्या पाठीशी ठाम राहिल्याने संख्याबळ नऊ झाले होते व सभापती म्हणून ता. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी गणेशराव पाटील करखेलीकर व उपसभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांची निवड करण्यात आली.

हेही वाचा - ‘मुख्यमंत्रीसाहेब, हे कडक निर्बंध लवकर उठवा. नाहीतर घरकामाने आणि बायकोचे टोमणे खाऊन आमचा जीव जायचा,’’ असे तो पुटपुटला.

त्यावेळी माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर एकत्र आल्याने काँगेसला बहूमताचा जादूई आकडा गाठता आला नव्हता. तसेच शिवसेनेचे निवडून आलेले संचालक देखील करखेलीकर गटास समर्थन दिल्याने काँगेसला बहूमत सिध्द करता आले नव्हते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. मीनल पाटील यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने तेंव्हापासून माजी खासदार खतगावकर यांनी धर्माबादकडे राजकीय दुर्लक्ष केले. त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या सभापती, उपसभापती निवडीत भाजपची धुरा कुणाकडे राहील हे अद्यापतरी स्पष्ट झाले नाही. राज्यात महाविकास आघाडी एकत्र आल्याने जिल्ह्यातील राजकीय चित्रही बदलत आहे. विशेषतः प्रत्येक निवडणूकीकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे धर्माबाद बाजार समिती पुन्हा काँगेसच्या ताब्यात घेण्यासाठी ते कोणती राजकीय गुगली टाकतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी आमदार गोरठेकरांचे विश्वासु समर्थक उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षाकडे घरवापसीची भूमिका घेतली असल्याने बाजार समितीच्या नूतन सभापती निवड प्रक्रीयेत त्यांची भूमिका व त्यांच्या समर्थक संचालकांची भूमिका तेव्हढीच महत्वपुर्ण ठरणार आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकित विनायकराव कुलकर्णी यांनी भाजपपासून दूर राहिल्याने धर्माबाद तालुक्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर गटास उमेदवार देखील मिळाला नव्हता हे विशेष. धर्माबाद बाजार समितीतील सध्याचे संख्याबळ पाहता पालकमंत्री मनावर घेतल्यास काहिही होऊ शकते, असा अंदाज अनेकजण व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्यांची काय भूमिका राहील व कोणते डावपेच यशस्वी ठरतील, हे तर येणाऱ्या वेळीच स्पष्ट होईल. सध्यातरी सभापती गणेशराव करखेलीकर यांनी राजीनामा दिल्याने वेगवेगळ्या तर्क- वितर्क चर्चेत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com