nanded municipal corporation election
sakal
नांदेड - नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत तब्बल १४ जणांना महापौरपदाची संधी मिळाली असून, यामध्ये सर्वाधिक काळ म्हणजे १३ वेळा काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. सुधाकर पांढरे यांच्या रूपाने प्रथम महापौर होण्याचा शिवसेनेला मान मिळाला. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे नांदेडवासीयांचे लक्ष लागून आहे.