Nanded News
Nanded News

हरणाच्या पाडसाला मिळाले जिवदान, कुठे? ते वाचाच

नांदेड : पांगरी ( ता. लोहा) येथील त्र्यंबक पाटील बुद्रुक यांच्या शेताच्या बांधावर रानटी कुत्र्यांनी हल्ला चढवत हरणाच्या पाडसाला जबर जखमी केले. या पाडसाला हल्यातून सोडवून वनरक्षकाच्या मदतीने लोहा येथील पशूचिकित्सालयात आणुन त्यावर उपचार करण्यात आले.

आता पूर्वीच्या सारखी पुरातन झाडी उरलेली नाहीत. उजाड डोंगरमाथा आताशा कुठेतरी पावसातुन  साचलेले डबके आणि हिरवे पोपटी लुसलुशीत गवताचे पाती कुठे कुठे पाहायला मिळतात.  रस्ता सोडून थोडं वर गेलं की  किरवड्याचा तलाव लागतो.  निळ्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर  या तळ्यावर  पाहुणे पक्षी आलेले दिसू लागतात. हे अद्भुत दृष्य पाण्यात प्रतिबिंबित होतात तासन् तास पहावसं वाटतं . क्वचितच आभाळातून रान बदकाच्या थव्यांचे कुजन  ऐकायचं.  

निसर्गप्रेमींनी केली पाडसाची सुटका
पर्यटक तासनतास सुनेगाव, केरोडा आणि रामाची वाडी तळ्याचे सौंदर्य  न्याहाळत  बसतात.  मृग संपून पंधरवाडा  उलटला असेल नसेल. गोदावरी नदी काठची  हरणाचे  कळप बालाघाटच्या डोंगर रांगांकडे  सरकू लागतात.  मध्यंतरी  शेतीवाडीतील  वस्ती  कुत्र्याचे केकाटणे आणि माणसाचा वावर  याचा सासूल  लागताच सावध पवित्रा घेत  हरणं बागडत असतात. बुधवारी असेच हरणं बागडत असताना एका नवजात पाडसाला रानटी कुत्र्यांनी जखमी केले. उपस्थित काही निसर्गप्रेमी व्यक्तींनी या पाडसाची सुटका केल्याने त्याचा जीव वाचला आहे. 

वन्यजिवांचे संरक्षण व्हावे
बुधवारी अवघ्या तीन महिण्याच्या पाडसावर रानटी कुत्र्यांनी हल्ला चढवला.  गोदावरी नदी काठ परिसरात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.  शेत पिकाचे नुकसान करत असल्याच्या तक्रारी उन्हाळ्यात अधिक असतात. पाऊस योग्यवेळी होत असल्याने चारा पाण्याचा प्रश्न मिटला  आहे. मात्र रानटी श्वापद, भटकी कुत्री आणि महामार्गावरचा रस्ता ओलांडत असतांना वन्यजीवाचे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या वन्यजीव अपघातातून जीव  वाचावेत यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com