नांदेड : मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला येईल का जाग ?

रस्ते वाहनांसाठी आहेत की मोकाट जनावरांसाठी नागरिकांचा संतप्त प्रश्न
नांदेड : मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला येईल का जाग
नांदेड : मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला येईल का जागsakal
Updated on

नांदेड : मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला येईल का जाग ?

रस्ते वाहनांसाठी आहेत की मोकाट जनावरांसाठी नागरिकांचा संतप्त प्रश्न

Will administration wake up only after big accident

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील रस्त्यांची दुर्दशा नागरिकांच्या जिवावर उठत आहे. त्यात पुन्हा भर पडली ती मोकाट जनावरे आणि श्वानांची. शहराच्या कुठल्याही रस्त्यावरून जा, मोकाट जनावरांचे कळपचे कळप दिसतात. मोकाट जनावरांना वाचविण्याच्या नादात दुचाकी स्वारांचे अनेकदा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. परंतु, प्रशासनाला अद्यापही जाग येत नाही. मोठ्या दुर्घटनेनंतरच महापालिका प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

गुरुतागद्दी सोहळ्यानिमित्त नांदेड शहरातील रस्त्यांची कामे झालेली आहेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फुटपाथही बांधलेले आहेत. परंतु, हे फुटपाथवर अतिक्रमण झालेले असल्याने पायी चालणाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच कडेने जीव मुठीत ठेवून चालावे लागत आहे. फुटपाथ बांधल्याने रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. पार्कींगचीही धड व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेलाच दोनचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे नेहमीच वाहतुक विस्कळीत होत असते. त्यातून अनेकदा छोटे-मोठे वादही होतात. असे असतानाही प्रशासनाच्या डोळ्यावरील पट्टी हटायला तयार नाही.

नांदेड : मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला येईल का जाग
राज्यात कोरोना नियंत्रणात येतोय; मार्च नंतर निच्चांकी संख्येची नोंद

मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर हल्ली शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. शहराच्या राजकाॅर्नर, तरोडा नाका, श्रीनगर, शासकीय विश्रामगृह, छत्रपती चौक, पावडेवाडी नाका, मोर चौक, अण्णाभाऊ साठे चौक आदींसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचे कळपचे कळप ठाण मांडून बसलेले असतात. परिणामी वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच आपली वाहने चालवावी लागत आहे. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, महापालिकेचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव दररोजच शहरामध्ये बघायला मिळत आहे.

श्वानांचीही नागरिकांत धास्ती शहरातील मुख्य रस्ता असो की अंतर्गत रस्ता, तेथे श्वानांचेदेखील कळप असतात. हे श्वान दुचाकी स्वारांच्या मागे लागत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला, मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्येही या मोकाट श्वानांची मोठी धास्ती निर्माण झाली आहे. यावरही महापालिका प्रशासनाने काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांना तसेच मोकाट श्वानांचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे. कारण अगोदरच शहरातील रस्त्यांमुळे वाहनधारक त्रस्त असून, आता मोकाट जनावरांचाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या जनावरांना वाचवण्याच्या नादात मोठा अपघात होऊ शकतो.

- श्यामराव वामनराव कोचारे, ज्येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com