सोनेतारणावर फायनान्स कंपनीकडून ९० टक्के कर्ज नाही

शिवचरण वावळे
Friday, 11 September 2020

सोने हे भारतीय संकृतीत सौदर्यात भर टाकणारे अभूषण मानले जाते. शिवाय सोने म्हणजे प्रतिष्ठा असे देखील एक समिकरण आहे. त्यामुळे देशात सोन्याला अन्यसाधारण महत्व आहे. मध्यवर्गीय व्यक्तीकडे सोन्याचे दागिने हऊस म्हणून नव्हे तर, अडचणीत कामी येणारी वस्तू म्हणून सोने खरेदी केली जेते.

नांदेड - सोन्याच्या किमतीच्या तुलनेत बँक, फायनान्स मार्फत ६० ते ७० टक्के कर्ज दिले जात होते. काही दिवसांपूर्वी या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकामार्फत २२ आणि २४ कॅरेट प्युअर सोन्याच्या दागिन्यावर ९० टक्यापर्यंत कर्ज दिले जात होते. हे खरे असले तरी सोन्याच्या दरात सतत चढ - उतार दिसून येत असल्याने खासगी फायनान्स कंपन्यांना देखील सोन्याच्या किमतीवर कर्जाची रक्कम देतांना अनेकदा विचार करावा लागत आहे.  

सोने तारणावर राष्ट्रीयकृत बँकांसहित खासगी फायन्स व शासनाच्या परवानगी असलेल्या सोने चांदीच्या व्यापाऱ्यांकडून देखील कर्ज दिले जाते. नांदेड शहरात सहा ते सात व्यापाऱ्यांकडून  सोन्याच्या दागिन्यावर कर्ज देण्यात येते. राष्ट्रीयकृत व व्यावसायीक बँकेमार्फत सोन्याच्या दागिन्यांवर सोन्याच्या मुळ किमतीच्या ९० टक्के रक्कम देण्यात अघाडी घेतली आहे. त्या तुलनेत काही खासगी फायनान्स व सोने चांदीच्या व्यापाऱ्यांकडून मात्र पूर्वी प्रमाणेच ६० ते ७५ टक्के इतकी रक्कम कर्जाच्या स्वरूपाती दिली जात आहे.

हेही वाचा- धक्कादायक घटना : मुल होत नसल्याने पती- पत्नीची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या..​

ग्राहक ७० टक्क्यावर ही समाधान 

लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला कामे नाहीत. आयुष्याची जमा पुंजी म्हणून घरातील सोन्याचे दागिने गहान ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. व्यवसायीक बँका आणि राष्ट्रीयकृत बँकेत २० हजारापासून ते २० लाखापर्यंत कर्ज दिले जाते. परंतू एक दोन ग्रॅमच्या दागिन्यावर कुणीही कर्ज देत नाही. त्यामुळे ग्राहकांना सोनाराकडे जाऊन दागिन्याची मोड केल्यास त्यावर दागिने खरेदी प्रमाणेच तीन टक्के इतका जीएसटी आकारला जातो. त्यामुळे दोन्ही कडून कचाट्यात सापडलेल्या सामान्य ग्राहकांना फायनान्स किंवा सोने-चांदीच्या व्यापाऱ्याकडून सोन्याच्या दागिन्यावर जी रक्कम मिळेल त्यावर समाधान मानावे लागत आहे. 

हेही वाचा- संगणक साक्षरते अभावी ऑनलाइन शिक्षणात सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अडथळा ​

नव्वद टक्के सोनेतारण कर्ज देण्यापूर्वी विचार करावा लागतो
शहरातील काही सोने चांदीच्या व्यापाऱ्यांकडे शुद्ध सोन्याच्या दागीन्यावर गोल्डलोन देण्याची अधिकृत मान्यता आहे. सध्या गोल्ड लोनवर ९० टक्के कर्ज देण्याची मुभा असली तरी, सोन्याच्या दरात रोज तासा- तासाला नव्याने दर कमी जास्त होत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिण्यांवर ९० टक्के लोन देण्यापूर्वी व्यापारी असोत वा खासगी फायनान्स कंपन्या,  त्यांना खुप विचार करावा लागत आहे.
- सुधाकर टाक (सोने चांदी व्यापारी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No 90% Loan From A Finance Company Nanded News