नांदेड - गुरूजी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या आऊटलेटचे आनंदनगर येथे गुरूवारी मारोतराव कवळे गुरूजी आणि किशोर पाटील लगळूदकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.
नांदेड - गुरूजी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या आऊटलेटचे आनंदनगर येथे गुरूवारी मारोतराव कवळे गुरूजी आणि किशोर पाटील लगळूदकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

शेतकरी व त्यांच्या मुलांना सर्वतोपरी मदत करणार - मारोतराव कवळे गुरूजी

 उमरी (जि. नांदेड) - नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी व शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योगासाठी व्हीपीके उद्योग समूह आणि पंतसंस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करुन आर्थिक बाजू बळकट करु, असे आश्वासन व्हीपीके उद्योग समूहाचे तथा वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी गुरूवारी (ता. २२ आॅक्टोंबर) दिले. 

नांदेड शहरातील आनंदनगर येथील चौकामध्ये गुरूजी दुध व इतर केमीकलमुक्त दुग्धजन्य पदार्थाच्या आऊटलेटचे उघडण्यात आले असून त्याचे उद्‍घाटन श्री कवळे गुरूजी आणि किशोर पाटील लगळूदकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दुकानामध्ये दुध, तुप, दही, पनीर, खवा, लोणी व गुळ पावडर आदी वस्तू ग्राहकांना अल्पदरात मिळणार आहेत. 

शेतकरी व त्यांच्या मुलांना मदत
जिल्ह्यातील सोळा तालुक्यात कवळे पतसंस्थेच्या शाखा उभारून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार देऊ तसेच त्या शाखेच्या माध्यमातून शेतक-यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींचे वाटप करुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुध संकलन करण्याचा मानस असल्याचे श्री कवळे गुरूजींनी सांगितले. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतक-यांच्या हातात कसा खेळता पैसा निर्माण करुन देता येईल, ते काम करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतक-यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता पुढे येऊन व्यवसाय निवडावा. त्यांनी आम्ही कवळे पतसंस्था व व्हीपीके उद्योग समूहाच्या माध्यमातून मदत करु. तसेच सोळा तालुक्यात दुग्धजन्य पदार्थांची दुकाने उघडून शेतक-यांच्या मुलांना काम देऊ, असे आश्वासनही श्री .कवळे गुरूजी यांनी दिले. 

दुधाचा पैसा शेतक-यांसाठी शाश्वत 
श्री. कवळे गुरूजी म्हणाले की, दुधाचा पैसा शेतक-यांसाठी शाश्वत आहे. पच्शिम महाराष्ट्राची ओळख दुग्ध व्यवसायामुळे झाली. त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आणि त्यांच्या मुलांसाठी जिल्ह्यातील सोळा तालुक्यात कवळे पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू. सोळा तालुक्यात दुग्धजन्य पदार्थांची दुकाने सुरू करून शेतकरी आणि त्यांच्या मुलांना काम देऊ, असे आश्वासन श्री. कवळे गुरूजी यांनी दिले. 

यांची होती उपस्थिती 
यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण, संभाजी पाटील आमदुरेकर, शिवाजी पाटील, भाऊराव कारखान्याचे संचालक श्यामराव पाटील आमराबादकर, मुंडे कोचिंग क्लासचे श्री. मुंडे, प्रभाकराव पुयड, जगन शेळके, दिलीप बास्टेवाड, शिवाजी पाटील चिंचाळकर, प्रल्हाद हिवराळे, शिवकुमार गाजवे, फैजल पटेल आदी उपस्थित होते. सिंधी येथील साईकृपा दुध डेअरीचे अध्यक्ष परमेश्वर पाटील कवळे व उद्योजक संदीप पाटील कवळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उमाजी नादरे यांनी सुत्रसंचालन केले तर आनंद चव्हाण यांनी आभार मानले.

(संपादन - अभय कुळकजाईकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com