छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री अब्रु रक्षणाची दिलेली शिकवण ही स्त्री अब्रुरक्षा जनजागृती व्हावी म्हणून मोटारसायकलद्वारे ही प्रचार मोहीम प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महाविद्यालय, सामाजिक ठिकाण, पोलिस कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हा परिषद आदी ठिकाणी भेटी देऊन प्रबोधन करण्यात येणार आहे.
नांदेड- स्त्री अब्रुरक्षा जनजागृती मोहिम अभियान ता. चार फेब्रुवारी रोजी वाशिम व हिंगोली जिल्ह्यात अभियान राबवून ता. सहा फेब्रुवारी रोजी नांदेड येथे नमस्कार चौकात दाखल होताच या रॅलीचे सामाजिक संघटनेच्यावतीने रॅली प्रमुख दिपक भालेराव यांचे स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री अब्रु रक्षणाची दिलेली शिकवण ही स्त्री अब्रुरक्षा जनजागृती व्हावी म्हणून मोटारसायकलद्वारे ही प्रचार मोहीम प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महाविद्यालय, सामाजिक ठिकाण, पोलिस कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हा परिषद आदी ठिकाणी भेटी देऊन प्रबोधन करण्यात येणार आहे.
नमस्कार चौक नांदेड येथे रॅली प्रमुख दिपक भालेराव यांचे स्वागत केल्यानंतर ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, ही मोहिम मोटारसायकलद्वारे आपण स्वतः फिरुन महिलांवर होणारे अत्याचार नाही झाले पाहिजेत, स्त्रीची रक्षा करणे हे प्रत्येक समाजबांधवाचे कर्तव्य आहे.
तसेच छत्रपती शिवरायांनी स्त्री अब्रू रक्षणाबाबत दिलेली शिकवण प्रत्येक जिल्ह्यात फिरुन विचाराद्वारे दिली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक संघटन, सामाजिक कार्यकर्ते विविध पदाधिकारी अशा विविध घटकांशी भेटून त्यांना सोबत घेऊन ही मोहिम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. व त्याबाबत प्रत्येक जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे, असे याप्रसंगी त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने व्यंकटी कलवले, सतीश सुगांवकर, संजय गोटमुखे, एल. बी. चव्हाण, साहेबराव गुंडीले, किरण गोईनवाड, उत्तम गायकवाड, रमेश भालेराव, आशा वाघमारे, यादव सुर्यवंशी, माधव गोरकवाड, रमेश वाघमारे, पी. एन. भालेराव, भारत सरोदे, रमेश घोडजकर, गंगाधर कावडे आदींची उपस्थिती होती.