
शिक्षण विस्तार अधिकारी तथा कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी पिंपळगाव (ता.अर्धापूर) बीटमधे अविरत काम करत आहेत.
नांदेड : कर्मचारी व अधिकारी यांच्यातील नाते केवळ सरकारी न राहता ते आपुलकीच्या धाग्याने बांधले गेले तर कार्यक्षमतेत निश्चितच बदल होतो, हे लक्षात घेवून शिक्षण विस्तार अधिकारी तथा कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी पिंपळगाव (ता.अर्धापूर) बीटमधे अविरत काम करत आहेत.
शैक्षणिक दर्जा वाढविण्यासोबतच ग्रामीण भागातील महिलांसह शिक्षिकांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुचिता खल्लाळ करतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी बीटमधील सर्व महिला शिक्षिकांचा एक स्वतंत्र व्हॉटसप ग्रुप तयार करून भावनिक पातळीवर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवादाची देवाणघेवाण सुरू केली. ‘मनस्विनी’ या सुंदर शिर्षक असलेल्या महिला शिक्षिकांच्या ग्रुपमध्ये दररोज सरकारी चाकोरीबाहेरच्या भावभावनांचं मैत्रीपूर्ण आदानप्रदान होतं. या ग्रुपमधे शिक्षिका नवनवीन विषयांवर मनमोकळी भावनिक व वैचारिक चर्चा करतात. दैनंदिन रहाटगाड्यातून नवी उर्जा मिळणारं आणि वर्गखोलीत पाऊल टाकताना सकारात्मक बळ देणारं ‘टॉनिक’ या संवादातून मिळतं.
हेही वाचा - Women's day 2021: हिंदू कोडबीलामुळेच महिलांची उन्नती- न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे
सध्या शासनाचे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण चालू असून त्यानिमित्ताने गावोगाव गृहभेटी देणे चालू आहे. याच संधीचा दुहेरी उपयोग करण्याचे ठरवून मातापालकांना त्यांच्या मुलांचा अभ्यास, आहार आणि आरोग्य या बाबींकडे लक्ष देण्याचे आवाहन पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट देऊनही समूपदेशन केले जात आहे. सध्या शासनाच्या ‘सुंदर माझा गाव’ या उपक्रमाचाही प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या भेटीत व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन मातापालकांना या शिक्षक-भगिनी करत आहेत. या मातापालक संवादसेतूद्वारे गावपातळीवर महिलांचे वैचारिक प्रबोधन घडवून आणण्यासाठी महिला महिलांच्या मैत्रीपूर्ण आवाहनाला प्रतिसाद देतानाचे सुंदर चित्र बघायला मिळत आहे.
हे देखील वाचा - कोरोनाची लस टोचायला जाताय? लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर अशी घ्या काळजी
मैत्रभावाच्या आपुलकीचा चेहरा
वेळोवेळी महिला शिक्षिकांचे व्हर्चूअल मेळावे घेऊन त्यांना प्रोत्साहीत करणे व काम करताना येणा-या अडीअडचणी समजून घेत, प्रशासनाला केवळ सरकारी न ठेवता मैत्रभावाच्या आपुलकीचा चेहरा देऊन कार्यक्षमता वाढण्यासाठी भावनिक आवाहनातून सकारात्मकता साध्य करणे या धारणेतून पिंपळगाव बीटमध्ये ‘नारीशक्ती’चा जागर अखंड सुरु आहे.
येथे क्लिक केलेच पाहिजे - Womens day 2021 : मुक्ताबाई पवारच्या बंजारा हस्तशिल्पाची केंद्राकडून दखल; संतोषकुमार
नारीशक्तींचा गौरव
पिंपळगाव बीटमध्ये महिलाशिक्षिकांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या आव्हात्मक काळातही वाडी-वस्ती-तांडे-पाड्यावरील लेकरांचे शिकणे थांबले नाही. कधी ऑनलाईन माध्यमातून तर कधी ऑफलाईन गृहभेटी, छापील स्वाध्यायपुस्तिका अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचं शिकणं अव्याहत चालूच आहे. जागतिक महिलादिनानिमित्त बीटमधील या अभूतपूर्व नारीशक्तीचा यथोचित गौरव करण्यासाठी ‘बीईंग ऊमन’ या वेबिनारसोबतच सर्व महिला शिक्षिकांना कोरोना काळातील शिक्षण योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा