भोकरच्या दलितवस्ती विद्युतीकरणाचे काम रखडले

बाबूराव पाटील
Monday, 30 November 2020


ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमार्फत मागासवर्गीय दलित वस्तीमध्ये विविध विकास योजनांची कामे राबविल्या जातात. जिल्हा परिषद अंतर्गत निधी उपलब्ध केल्या जातो मात्र सदर निधीची योग्य अंमलबजावणी होत नाही. चालू वर्षी भोकर तालुक्यात अशाच प्रकारे दलित वस्तीचा निधी प्राप्त झाला मात्र विद्युतीकरणाच्या कामासाठी हलक्या दर्जाचे साहित्य असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून साहित्य वापस केले आहे. 
 

भोकर, (जि. नांदेड) ः ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमार्फत मागासवर्गीय दलित वस्तीमध्ये विविध विकास योजनांची कामे राबविल्या जातात. जिल्हा परिषद अंतर्गत निधी उपलब्ध केल्या जातो मात्र सदर निधीची योग्य अंमलबजावणी होत नाही. चालू वर्षी भोकर तालुक्यात अशाच प्रकारे दलित वस्तीचा निधी प्राप्त झाला मात्र विद्युतीकरणाच्या कामासाठी हलक्या दर्जाचे साहित्य असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून साहित्य वापस केले आहे. 

 

भोकर तालुक्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तीत विकास करण्यासाठी २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी निधी उपलब्ध करण्यात आला. १३ मे २०२० रोजी या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. त्यानुसार भोकर तालुक्यातला २ कोटी ४६ लाख रुपये निधी उपलब्ध झाला. त्यामध्ये गावनिहाय सीसी रस्ता, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, समाज मंदीर, असे कामे प्रस्तावित करण्यात आली. 

हेही वाचा -  नांदेड : शेतकरी आंदोलकांवरील केंद्राच्या दडपशाही धोरणाचा निषेध- शंकर धोंडगे -

 

विद्युतीकरणाचे साहित्य हलक्या दर्जाचे
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत काही गावांना विद्युतीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. ४ एलईडी हाय मॅक्स खांबासाठी ५ लाख रुपये तर दोन एलईडी खांबासाठी २.५० लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला. सदर हाय मार्क्स एलईडी खांब हे आयएसआय मार्क असलेले असावे व तांत्रिक मान्यते नुसार त्या कंपनीचे असावे असा नियम आहे. मात्र हलक्या दर्जाचे साहित्य काही गावामध्ये आणून टाकण्यात आले होते. भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी. एल. रामोड यांनी सदर साहित्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. आय.एस.आय मार्क आणि तांत्रिक मान्यतेनुसार सदर साहित्य नसल्याने आपण या साहित्याचे देयके काढणार नाही असे सांगताच संबंधित गुत्तेदार यांची धावपळ उडाली आणि हलक्या दर्जाचे टाकलेले साहित्य त्यांनी उचलून नेले. त्यामुळे विद्युतीकरणाचे काम सद्यस्थितीत मात्र रखडलेले आहे. काही ठिकाणी सीसी रस्ता व नाली बांधकामाचे काम उरकण्यात आले मात्र विद्युती करण्याचे काम झाले नसल्याने चर्चेचा विषय होत आहे. 

भोकर तालुक्यात समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधार योजनेच्या विद्युतीकरणासाठी निधी उपलब्ध झाला. त्याचे साहित्य काही गावामध्ये आणून टाकण्यात आलेले होते. ते साहित्य पाहण्यासाठी प्रत्यक्ष आपण जाऊन पाहणी केली. मात्र सदर साहित्य आयएसआय मार्क नसलेले होते. त्यामुळे आपण सदर हलक्या दर्जाचे साहित्याचे देयक काढणार नाही असे जी. एल. रामोड, गटविकास अधिकारी यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Work Of Electrification Of Dalit Slums Of Bhokar Was Delayed, Nanded News